गुगवाडमध्ये आरोग्य‌ उपकेंद्र मंजूर करा ; ग्रामपंचायतीची मागणी

0



गुगवाड,वार्ताहर : गुगवाड ता.जत येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर करावे,अशी मागणी संरपच महादेव अंदानी यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.

तशा मागणीचे निवेदन अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार यांची भेट घेत दिले आहे.यावेळी उपसंरपच शंकर कांबळे उपस्थित होते.

गुगवाड हे गाव सध्या बिळूर प्राथमिक आरोग्य केंद्रा अतर्गंत येते.





ते अंतर सुमारे 15 किलोमीटरचे आहे.शिवाय जवळ उपकेंद्र नसल्याने गावातील नागरिकांची उपचारासाठी हाल होतात.महिलाच्या प्रस्तूतीसाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.अनेकवेळा वाहने नसल्याने रुग्णाचा जीव जाण्याची भिती असते.त्याचबरोबर कोरोना,डेंगू,मलेरिया सारख्या साथीच्या आजाराचा सामना करताना ग्रामपंचायतीला मोठी अडचण होत आहे. साध्या आजारासाठी एकतर खाजगी दवाखाना अथवा बिळूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत आहे. त्यात वेळ व आर्थिक भुर्दड सोसावा लागत आहे.



Rate Card



त्यामुळे सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या गुगवाड साठी स्वतंत्र आरोग्य उपकेंद्र मंजूर करावे अशी मागणी अंदानी यांनी केली आहे.

दरम्यान गुड्डेवार यांना अंदानी व कांबळे यांनी वस्तूस्थिती सांगितली आहे.त्यांनी सत्कारत्मक प्रतिसाद दिल्याचेही अंदांनी यांनी सांगितले.



गुगवाड ता.जत मध्ये आरोग्य उपकेंद्र मंजूर करावे,या मागणीचे निवेदन अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार यांना देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.