पाण्याने पूर्ण ओंजळ भरून आलो आहे ; ना.जयंत पाटील | बसवराज पाटील, प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब, मोहन कुलकर्णी सह शेकडो कार्यकर्त्याचा प्रवेश

0



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात एकेकाळी सभांमध्ये पाणी हा एकमेव चर्चेचा विषय असे,मात्र मी जलसंपदा विभागाचे कामकाज हाती घेतल्यावर सर्वप्रथम पाणी नियोजनाचे कार्य हाती घेतले. त्याचाच एक भाग म्हणून पुराचे पाणी जत तालुक्यातील तलावात वळवण्याचे काम सुरू केले आणि आज

12-13 तलावात सध्या सोडण्यात येत आहे.तालुक्यातील 5 तलाव पाण्यानी भरलेली आहेत.पुर्व भागातील वंचित गावांसाठी आता पाण्याची उपलब्धता झाली असून आराखडाही पुर्ण झाला आहे. मंत्री मंडळाची मान्यता मिळताच दीड-दोन वर्षात योजना पुर्ण करू,असे आश्वासन जलसपंदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिले.






जत तालुक्यात संख येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष श्री. बसवराज पाटील, बाजार समितीचे माजी सभापती श्री. प्रकाश जमदाडे,पंचायत समितीचे माजी सभापती श्री. मन्सूर खतीब, माजी नगरसेवक श्री. मोहन कुलकर्णी यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्याचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने ना.पाटील यांनी स्वागत केले.यावेळी जत तालुक्याला 6 टिएमसी पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना.जयंतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.




ना.जयंतराव पाटील पुढे म्हणाले,जत तालुकाच्या विकासासाठी आपण एकसंघपणे आता कार्य करू शकणार आहोत,याचे समाधान वाटते. जतमधील सुमारे 65 गावांना आता हक्काचे पिड्यान् पिड्या 6 टीएमसी पाणी मिळणार आहे.येत्या चार-सहा महिन्यात सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून हे काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न प्रयत्न सुरू आहेत.




आदरणीय राजारामबापू यांना प्रचंड प्रेम या जत तालुक्याने दिलेले आहे. एक मंत्री म्हणून नाही तर बापूंचा मुलगा म्हणून तुम्ही मला आपलंसं केले आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळेच आज तुम्हाला भेटण्यासाठी पाण्याने पूर्ण ओंजळ भरून आलो आहे.दुष्काळी तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मी जलसंपदा‌ खाते घेतले आहे.यासाठी आता अन्य कोणाकडे निवेदन देण्याची गरज‌ नाही.

जत तालुक्याने यापुर्वी कायम बापूना साथ दिली आहे. त्यांच्या मुलगा म्हणून मला लोकांचे मोठी मदत होते आहे.

ना.जयंतराव पाटील 




म्हणाले,तालुक्यातील बसवराज पाटील, प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब यांनी सातत्याने आम्हाला पाणी कधी देणार हाच ठेका लावला होता.त्यामुळे त्यांना आम्ही राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये‌ प्रवेशाचे‌ आमत्रंण देऊन प्रवेश झाले नव्हते.मात्र आता पाणी प्रश्न संपविण्याचे ठोस नियोजन घेऊन मी त्यांच्याकडे आलो आहे.या प्रवेशामुळे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या विचाराला बळकटी मिळणार आहे.त्यांच्याकडून प्रत्येक भागातील जनतेचे‌ प्रश्न सुटले पाहिजेत आता कटाक्ष असतो.


Rate Card



तुबची-बबेश्वरवर फुली


जत पुर्व भागातील गावांना पाणी देण्यासाठी अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या तुबची-बबलेश्वर पाणी योजनेतून जतसाठी देणे शक्य नसल्याचे पत्र कर्नाटक सरकारने दिले आहे. मी स्व:ता कर्नाटकचे मुख्यमंत्री येडिराप्पा यांना भेटलो होतो.त्यावेळी त्यांनी तुबची-बबलेश्वर शिवाय अन्य एकल पर्याय देतो असे सांगितले होते मात्र त्यादरम्यान आपल्या सरकारच्या या योजनेचा आराखडा व पाण्याची उपलब्धता झाली आहे.येत्या दोन-तीन महिन्यात अतिंम आराखडा,मंत्रीमंडळाची परवानगी घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असे सांगत‌ त्यांनी तुबची-बबलेश्वर योजनेवर फुली मारली आहे.

बसवराज पाटील म्हणाले,जत तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी लोकनेते राजारामबापू पाटील यांनी त्या काळात प्रयत्न केले होते.जत तालुक्याला पाणी द्यावे म्हणून त्यांनी पदयात्रा काढली होती.त्याचे स्वप्न आता त्याचा मुलगा म्हणून ना.जयंत पाटील पुर्ण करणार हे निश्चित झाले आहे.




प्रकाश जमदाडे म्हणाले, जत तालुक्यातील पाणी प्रश्नासह जनतेचे प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही सातत्याने आंदोलन करत होतो.जलसंपदा मंत्री यांनी जत‌ तालुक्यातील 65 गावासाठी पाणी उपलब्ध करण्यासह योजनेचे काम अतिंम टप्यात आणले आहे.त्याशिवाय तालुक्यातील इतर प्रश्नही त्यांनी सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे यापुढील काळात राष्ट्रवादी कॉग्रेसला बळकटी येईल.यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक,लालासाहेब यादव,रमेश पाटील,रावसाहेब पाटील,बाळासाहेब पाटील,सुरेशराव शिंदे,लिंबाजी पाटील,पुजा लाड,गिता कोडग आदीसह तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेते सुभाष बसवराज पाटील यांचा वाढदिवस ना.जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत यावेळी केक कापून संपन्न झाला.पाटील यांचा ना.जयंतराव पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.



संख ता.जत येथील राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये बसवराज पाटील, प्रकाशराव जमदाडे, मन्सर खतीब,मोहन कुलकर्णी यांचा पक्षप्रवेश सोहळा ना.जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी बोलताना ना.जयंतराव पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.