विलासराव जगताप यांच्यावरील गुन्हा तात्काळ मागे घ्या ; पृथ्वीराज देशमुख | जिल्हा ‘बंद’ चा इशारा

0



जत,संकेत टाइम्स : खोटा गुन्हा दाखल करून भाजपा नेते,कार्यकर्त्याचे खच्चीकरण खपवून घेणार नाही,जरी राज्यात आमचे सरकार नसले तरी देशाचे गृहखाते आमच्याकडे आहे.पोलीसांनी राजकीय दबावाला बळी न पडता निरपेक्ष काम करावे,कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका,खोटा गुन्हा मागे न घेतल्यास जिल्हा बंद करू,असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिला.

जतचे‌ माजी आमदार विलासराव जगताप यांच्या विरोधात उमदी पोलीसांनी गुन्हा दाखल केल्याच्या‌ पार्श्वभूमीवर भाजपाच्या‌ वतीने शनिवारी पोलीस कारवाईच्या निषेधार्थ जत प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले.

यावेळी माजी आमदार विलासराव जगताप,तालुकाध्यक्ष सुनिल पवार,माजी सभापती तम्मणगौडा रवीपाटील, प्रा.बि.आर.पाटील,नगरसेवक उमेश सांवत,नगरसेवक स्वप्निल शिंदे व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांना निवेदन देण्यात आले.






देशमुख पुढे म्हणाले,उमदी पोलीसांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर कोणताही पुरावा नसताना राजकीय दबावातून गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भात मी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्याशी बोललो आहे.ते गृहमंत्री,पालकमंत्री, आयजी शी बोलतो म्हणाले आहेत.

विरोधकांनी एवढ्या खालच्या दर्जाचे राजकारण करू नये,अशा कारवाईने पोलीसांनी कायदा हातात घेण्याची वेळ आणली आहे.कोण सांगतय म्हणून जर पोलीस गुन्हा दाखल करत असतीलतर सत्ता सतत बदलत असते,हे पोलीसांनी लक्षात ठेवावे,यापुढे‌‌ जशाच तसे उत्तर देऊ,चार दिवसात गुन्हा मागे न घेतल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन करू,असा इशाराही देशमुख यांनी दिला.

Rate Card

आमदार विलासराव जगताप म्हणाले,जत‌ तालुक्यात मोगलाई आली आहे काय,उमदी पोलीसांनी खोटे गुन्हे  कोणाच्या दबावातून दाखल केले आहेत, यांची चौकशी व्हावी,गुन्हा दाखल करणाऱ्या ठाणे अंमलदारावर तात्काळ कारवाई करावी.आरोपी सराईत‌ गुन्हेगार आहेत,त्यांच्याकडून आणखीन गुन्हे घडण्याची शक्यता आहे, गावात त्यांची दहशत असल्याने साक्षीदार पुढे‌ येत नाहीत.त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली आहे.

स्थानिक आमदार व मंञ्याच्या दबावाखाली दाखल केलेला गुन्हा तात्काळ मागे घ्यावा,तसेच मुरलीधर जगताप यांच्या फिर्यादीतील आरोपींना तात्काळ अटक करावी,अन्यथा तालुकाभर पोलीसाविरोधात‌ आंदोलन करू,असा इशाराही माजी आमदार जगताप यांनी दिला आहे.




जत येथील उपोषणात‌ बोलताना माजी आमदार विलासराव जगताप

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.