राजकारण विरहित समाजकार्याची गरज ; तुकाराम बाबा

0
21
जत, संकेत टाइम्स : राजकारण विरहित समाजकार्य करणे हेच आपले लक्ष आहे. राष्ट्रीय संत गाडगेबाबा, बागडेबाबा यांनी आयुष्यभर समाजजागृती व समाजकार्य केले त्यांच्याच विचारांचा वारसा जपणार असल्याचे प्रतिपादन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
तालुक्यातील शेगाव येथे ओम साई प्रतिष्ठानच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्य पुरस्कार सोहळा व भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित केल्या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  तुकाराम बाबा महाराज बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून शेगावच्या सरपंच सुनिता माने , संतोष सनदी , अँड.अशोक शिंदे, डॉ. रोहन मोदी, रोहन मोदी, मुख्याध्यापक नदाफ , ओम साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाधान माने, बबलू शिंदे,जितेंद्र बोराडे, भारत शिंदे, सागर बागल, प्रमोद साळे, लवकुमार मुळे, चंद्रकांत शिंदे, राहुल ताटे, गौरी माने, आबासो शिंदे, आनंदा किसवे, रामचंद्र रणशिंगे, कोडगसर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ.  अक्षयकुमार शिंदे, डॉ. जगदीश गायकवाड, डॉ. संभाजी देशमुख,  डॉ. दीपक तेली,डॉ.  शिवाजी खिल्लारे, डॉ.संजय नाईक, डॉ.आण्णासाहेब कोडग, पोलीस विकास गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी राम गंगणे, सत्यजित नाईक, लवकुमार मुळे, उत्तम शिंदे, आबासाहेब गायकवाड, सचिन माने, अनिल मुळे, पत्रकार भागवत काटकर तर आदर्श संस्थेचा पुरस्कार कोसारी येथील ग्रामीण विकास संस्थेला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोरोना काळात जत तालुक्यातील ९० गावात ६० टन धान्य, ४५० टन भाजीपाला वाटप केला. अतिवृष्टी, दुष्काळ, महापुरातही श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून मदत केली. ही मदत नव्हे तर अडचणीत असलेल्यांना मदत करणे कर्तव्य होते. अशाच पद्धतीचे कार्य ओम साई प्रतिष्ठानसह सामाजिक संस्थेने करावे असे आवाहन तुकाराम बाबा यांनी केले.

 

 

विक्रम ढोणे यांनी ओम साई प्रतिष्ठानने वर्षभरात केलेल्या कामाचे कौतुक केले. प्रास्ताविकेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाधान माने यांनी प्रतिष्ठानने केलेल्या कामाची माहिती सांगितली. पुरस्कार सोहळ्यानंतर आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 जत : ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार प्रदान करताना तुकाराम बाबा महाराज, विक्रम ढोणे, डॉ. रोहन मोदी आदी.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here