गुलगुंजनाळ परिसरात हरणांचा वावर

0
Rate Card



भिवर्गी,संकेत टाइम्स :जत तालुक्यातील गुलगुंजनाळ- कोंतेवबोबलाद येथील वन विभागात,कर्नाटक सीमेलगतच्या कन्नूर, शिरनाळ परिसरात गेली दीड महिन्यांपासून कळपातून चुकून आलेले हरीण फिरत आहे. त्याला पाळीव कुत्रे, शिकारी कुत्रे यांचा त्रास होत आहे. त्याच्या जिवाला धोका आहे. या हरणाला वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करून ताब्यात घेण्याची गरज आहे.




गुलगुंजनाळ – कोंतेबोबलाद वन विभागात कर्नाटक सीमेवरील कन्नूर शिरनाळ हद्दीतील ब्रम्हणापूर उपसा सिंचन परिसरात नर हरीण गेली दीड महिन्यापासून फिरत आहे.हरीण चुकून आले असावे,कर्नाटकातील मठात हरीण पाळले असून तेथून हे हरिण पळून आले असावे,असा अंदाज आहे.मेंढपाळांना नेहमी हरणाचे दर्शन होत आहे.दरम्यान गेल्या दीड महिन्यापासून हरीण फिरत आहे.कुत्री, अज्ञात व्यक्तीकडून शिकार होण्याची शक्यता आहे.वन विभागाने दक्षता घेऊन ते‌ नैसर्गिक आधिवासात सोडावे,असे शेतकऱ्यांनी आवाहन केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.