सुनिल कवठेकर हटावसाठी रिपाइं आक्रमक | 23 संप्टेबरला प्रांत कार्यालयाला ठाळे ठोकणार,उपोषणाचा इशारा

0



जत,संकेत टाइम्स : उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातील जनतेशी उद्धट वर्तन करणा-या सुनिल कवठेकर या मग्रुर कर्मचाऱ्यावर त्वरीत बदली करण्यासह अन्य मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयाला टाळे ठोक व  कार्यालयासमोर गुरूवार दिनांक 23 सप्टेंबर 2021 रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा रिपाइंकडून देण्यात आला आहे.

तसे निवेदन प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांना दिल्याचे रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी सांगितले. 

निवेदनात म्हटले आहे, प्रांताधिकारी कार्यालयातील सुनिल कवटेकर हा कर्मचारी साहेब होऊन बसला आहे,कोणत्याही कामासाठी नागरिकांचा छळ करणे,उद्धट बोलणे असे प्रकार कवटेकर यांच्याकडून वारवांर होत आहेत.त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची तात्काळ इतत्र बदली करावी.तालुक्यातील विविध शासकिय कार्यालयात अधिकाऱ्यासह, कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत. ही पदे वर्षानुवर्षे रिक्त असूनही याकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही.रिक्त पदामुळे अतिरिक्त ताण इतर कर्मचाऱ्यावर पडत आहे.त्यामुळे नागरिकांची कामे लांबणीवर पडत आहेत.ती रिक्त पदे तात्काळ भरावीत. 

जत येथिल लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.यल्लमादेवी यात्रेकरिता अरक्षित असलेल्या जागेवरील बेकायेशीरअतिक्रमणे, जत हायस्कूल व  घाटगेवाडी रोडवरिल ओढापात्रावर प्लाॅटींग साठी धनदांडग्यानी केलेल्या अतिक्रमणांची या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. या‌मागण्यासाठी गुरूवार दिनांक 9 सप्टेंबर 2021 रोजी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते.नागरिक,राजकीय व सामाजिक पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याशी उद्धट वर्तन करणारे व कार्यालयातील कामासाठी अडवणूक करणारे कर्मचारी सुनिल कवठेकर यांची चौकशी करून त्यांची त्वरीत बदली करणे ही आमची प्रमुख मागणी होती.परंतू प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, आम्ही पुन्हा आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्यानुसार आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली यांच्यावतीने गुरूवार दिनांक २३ सप्टेंबर २०२१ रोजी वरिल मागण्यांसंदर्भात आंदोलन करित असून यावेळी प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही आपले कार्यालयाला टाळे लावणार आहोत,असेही निवेदनात म्हटले आहे. 



जत,उमदीतील अवैध धंदे बंद करा 

Rate Card


पोलीसांच्या आशिर्वादने जत तालुक्यात सुरू असलेली खासगी सावकारी, मटका,चक्रीजुगार असे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात जत,उमदी पोलीस अपयशी ठरले आहेत.तालुक्यात हे

अवैध धंदे बंद करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम यांनी विशेष पथक नेमावे अशी मागणी रिपाइंचे‌ जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली आहे.


 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.