जत तालुका पुन्हा कोरोना रुग्णांचा उच्चांक | गुळवंची,मिरवाड,माडग्याळमध्ये चिंता वाढली

0



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात सोमवारी पुन्हा नव्या कोरोना रुग्णांची उच्चांकी संख्या नोंद झाली आहे.जत,माडग्याळ, अंतराळ,गुळवंची,आंवढी,मिरवाड,वाषाण येथे पाचपेक्षा जादा रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.

तालुक्यात गेल्या चार दिवसात दररोजचा आकडा तीसच्या आसपास होता.त्या सोमवारी तिप्पट वाढ होत तब्बल 82 नवे रुग्ण आढळून आले आहेत.






तर 40 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.दुसरीकडे सलग दुसऱ्या दिवशी एकाही रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.785 रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत. सोमवारपर्यत तालुक्यात एकूण 12,602 रुग्णाची नोंद झाली आहे.जत 7,बिरनाळ 3,काराजनगी 1,देवनाळ 2,बिळूर 3,माडग्याळ 7,कुलाळवाडी 1,उमदी 1,आसंगी जत 1,आसंगी तुर्क 1,करेवाडी को 1,को.बोबलाद 1,अंतराळ 6 ,गुळवंची 10,आंवढी 6,कुंभारी 2,बेवनूर 2,वाळेखिंडी 3,शेगाव 3,सिंगनहळ्ळी 1,बनाळी 1,मिरवाड 7,जत 2,बेंळूखी 2,वाषाण 6,डफळापूर 2 असे 82 नव्या रुग्णाची भर पडली आहे.

Rate Card






तालुक्यात अद्याप दुसरी लाट संपण्याचे नाव घेत‌ नसतानाचं तिसऱ्या लाटेचा धोका भिती वाढवत आहे.एकीकडे जिल्ह्यात रुग्णाची संख्या कमी झाल्याने सर्व निर्बंध शिथिल केले आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. परिणाम सोशल डिस्टसिंग, मास्कचा विसर पडल्याने रुग्ण वाढीला पोषक वातावरण आहे.त्यामुळे प्रशासनाच्या नियम आहेतच,मात्र स्व:ता काळजी घेण्याची नितांत गरज आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.