संजयराव कांबळे यांची आरपीआयच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

0



जत,संकेत टाइम्स : समाजकारण असो अथवा राजकारण, आपली सक्रियता कायम ठेवूण आपली उपयुक्तता समाजाच्या कामी यावी म्हणून सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे कार्यकुशल नेतृत्व म्हणजे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजयराव काबंळे होतं,पक्ष,लोकहिताच्या कामामुळे त्यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करून पन्हा जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

आरपीआयची नुकतीच मिरज येथे प्रदेश सचिव विवेक कांबळे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.त्यात संजयरावजी कांबळे यांनी पक्षासाठी केलेल्या कामाची दखल घेत पुन्हा जिल्हाध्यक्ष पदी फेरनिवड करत जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.

यावेळी लोकसभा क्षेत्र अध्यक्ष संदेश भंडारे,युवा आघाडी कार्याध्यक्ष हेंमत चौगुले,अभिजीत आठवले,बापू सोनवणे,सुनिल साबळे,सर्व तालुकाध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

संजयराव कांबळे दुरदृष्टीने झपाटुन काम करणारं गतिमान नेतृत्व! त्यांच्यासोबत काम करतांना वेगळीच उर्जा मिळते. त्यांनी जेंव्हा पासुन संघटनेची जबाबदारी स्विकारली आहे, त्या प्रत्येक जबाबदारीत सतत जागृत असणार नेतृत्व,जत शहरातील तरूण वयात राजकारणात येत आपली वेगळी व स्वतंत्र ओळख निर्माण करणारे संजयराव कांबळे यांनी शहरासह तालुक्याचा प्रश्नावर गेल्या 38 वर्षापासून संघर्ष सुरू ठेवला.अनेक आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्याप्रश्नाला वाचा फोडली.किंबहुना त्यांच्या आंदोलनाच्या धसक्याने प्रशासन वटणीवर आले आहे. जत शहरातील विविध विषयावर आंदोलन उभारून त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. ग्रामपंचायत सदस्य पासून सुरू केलेला राजकीय प्रवासात त्यांनी जतचे उपसंरपच, संरपच,रिपाइचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विविध समित्याचे सदस्य अशी पदे मिळली आहेत. त्या पदाला न्याय देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणीय आहे.शहरातील अनेक प्रश्नावर त्यांची आंदोलने आजही सुरू आहेत.रिपाइच्या चळवळीला खऱ्या अर्थाने संजयजी कांबळे यांनी गती दिली आहे. दलित पँथर पासून त्यांनी काम केले आहे.रिपाइ चळवळीत काम करताना जनतेला न्याय मिळवून दिला आहे.रिपाइचे संस्थापक तथा केंद्रित राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी त्याचे थेट संबंध आहेत.संजयरावजी कांबळे यांच्या कार्याचा गौरव करत सध्या त्याच्यावर आयपीआयच्या जिल्हाध्यक्ष पदी पुन्हा निवड करत जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.जत शहरातील रस्ते,पाणी,अस्वच्छता, नगरपरिषद प्रशासन,महसूल प्रशासन यांना वेळोवेळी आंदोलने करून लोकानुभिमूक कारभार करण्यास भाग पाडले आहे.

जतेत कांबळेच्या आंदोलनाची प्रशासनाला जरब

Rate Card

सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे,असा दंडक संजयरावजी कांबळे यांचा जिल्ह्यात आहे.दिन दलित,गरीब,अन्यायग्रस्त नागरिकांसाठी ते धावून जातात.जत तालुक्यात अन्यायाविरोधात लढणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांच्या आंदोलनाची प्रशासनावर जरब आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळतो आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.