बेंळूखीचे पहिले लोकनियुक्त संरपच वसंत चव्हाण यांचे निधन

0



डफळापूर, संकेत टाइम्स : बेंळूखी ता.जत येथील पहिले लोकनियुक्त संरपच वसंत शामराव चव्हाण यांचे गुरूवारी  आकस्मिक निधन झाले.

हालाखीच्या परिस्थीतीतून जीपचे चालक,ते संरपच असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे.




Rate Card



दुध संकलनाचा त्यांचा मोठा व्यवसाय होता.त्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून स्वंयपुर्ण केले होते.बेंळूखीत गेल्या चार वर्षात त्यांनी चांगल्याप्रकारे विकासकामे करून ओळख निर्माण केली होती.गत आठवड्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.




सांगलीतील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.गुरूवारी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.