सरकार पुरबाधीताच्या पाठीशी ; कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

0



मुंबई : सांगली  जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने नदी  काठावरील गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासन स्तरावरून पुरग्रस्तांना तात्काळ दिलासा देण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी या साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.






सांगली जिल्ह्यामधील अतिवृष्टी व पुर यामुळे बाधीत झालेल्या पुरग्रस्तांना तात्काळ मदत करण्याची आवश्यकताच असून  जिल्ह्यामध्ये पुरामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून नदी काठावरील गावांना यांचा मोठा फटका बसला आहे. यामुळे  बाधीत कुटूंबाना तात्काळ मदत करण्याची आवश्यकता आहे. 

Rate Card





यासाठी बाधीतांना देण्यात येणारे सानुग्रह अनुदान, निर्वाह भत्ता, घर व गोठ्यांची झालेली पडझड आदी साठी शासनाच्या नेहमीच्या प्रचलित शासन निर्णयानुसार सुमारे 400 कोटी रुपये एवढ्या अनुदानाची आवश्यक असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केलेला आहे.  याबाबत  विभागीय आयुक्त यांच्या मार्फत रितसर प्रस्ताव  उपलब्ध करुन घेवून निधीची उपलब्धता करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली.   



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.