निगडी खुर्द खून प्रकरण,दोघे अटकेत | पुण्यामधून संशयितांना घेतले ताब्यात

0





जत,संकेत टाइम्स : निगडी खुर्द ता.जत येथे शिवसेना कार्यकर्ता तुकाराम शिवाजी ताटे यांच्या खूनप्रकरणी दोघा संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून निगडी खुर्द,माडग्याळ,येथील दोघाचा यात‌ समावेश आहे,अन्य तिघा संशयिताचा शोध सुरू आहे.जमिनीत मुरूम टाकण्याच्या कारणारून खून झाला असल्याचे पोलीसाच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.अद्याप पुर्ण घटनेचा उलघडा झालेला नाही,पोलीस कसून तपास करत आहेत.





मुळ चपरासवाडी(शेगाव)येथील असलेले शिवाजी ताटे निगडी खुर्द-बनाळी रस्त्यावरील जमिनीत एकटेच राहत होते.सोमवारी त्यांचा धारदार शस्ञाने खून झाला होता.तेव्हापासून त्यांचा मोबाईल व स्कार्पिओ गाडी गायब झाली होती.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागांने या प्रकरणातील मुळ निगडी खुर्द येथील एका मुख्य संशयितास पुणे येथून ताब्यात घेतले आहे. 





त्याचबरोबर माडग्याळ येथील भाज्यालाही पकडले असून अजून तिघे अद्याप फरारी आहेत.दरम्यान ताटे‌ यांची स्कार्पिओ गाडीही पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.

Rate Card






लगतच्या शेतात मुरूम टाकण्यावरून संशयित व ताटे यांचा वाद झाला होता.त्यातून हा धारदार हत्यारांने तब्बल 32 वॉर करून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

पुर्ण घटनेचा अद्याप उलगडा झाला नसल्याने सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.मात्र दोघा संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांनीच खून केल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याचे समजते.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.