आयर्विन पूल येथे पाणी पातळी स्थिर संध्याकाळपर्यंत पाणी संथ गतीने उतरेल ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी | अफवांवर विश्वास ठेवू नका

0



सांगली : कृष्णा-कोयना नद्यांच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात व धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कृष्णा पूल कराड, बहे पूल, ताकारी पूल व भिलवडी पूल येथील पाणी पातळी कमी झालेली आहे. आयर्विन पूल सांगली येथील पाणी पातळी दुपारी 1 वाजता 54.6 इतकी झालेली आहे. सध्या ती स्थिर होत असून वारणा धरणातून विसर्ग कमी करून तो 8 हजार 720 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. विसर्ग निर्गमित होण्यास खालील बाजुच्या विसर्गामुळे वेळ लागणार असल्याने संध्याकाळपर्यंत पाणी पातळी स्थिर राहून संथ गतीने उतरेल. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.





ज्या भागात पाणी सद्या वाढत आहे त्या भागातील नागरिकांनी त्वरीत स्थलांतरीत व्हावे. नागरिकांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी प्रशासनाने मदत केंद्रे स्थापन केली आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घ्यावी. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वासू ठेवू नये, वेळोवेळी अद्यावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास सुरू करण्यात आले आहेत.

             




जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष व तालुका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे. जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 0233-2600500, टोल फ्री 1077, मो.क्र. 9307844825/ 9370333932/ 8208689681 / 9307849023, तहसिल कार्यालय मिरज 0233-2222682, तहसिल कार्यालय कवठेमहांकाळ 02341-222039, 

Rate Card





तहसिल कार्यालय तासगाव  02346-250630, तहसिल कार्यालय जत 02344-246234, तहसिल कार्यालय खानापूर 02347-272626, तहसिल कार्यालय आटपाडी 02343-295070, तहसिल कार्यालय कडेगाव 02347-243122, तहसिल कार्यालय पलूस 02346-226888, तहसिल कार्यालय वाळवा 02342-222250, तहसिल कार्यालय शिराळा 02345-272127. तसेच सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्रमांक 0233-2301820, 2302925 यावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.