जतेत बीएलओचे मानधन कधी मिळणार,शिक्षक भारतीचे निवेदन

0



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील बीएलओ म्हणून कार्यरत असणाऱ्या शिक्षक व अन्य कर्मचारी यांचे मानधन अद्याप मिळलेले नाही,याबाबत जतचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी लेखी मागणी दोन महिन्यांपूर्वी केली आहे.त्यावेळी येत्या 10 दिवसात बीएलओ मानधन शिक्षक व कर्मचारी यांच्या खात्यावर जमा करण्याचे‌ आश्वासन तहसीलदार पाटील यांनी दिले होते.मात्र दोन महिने उलटून गेले तरीही मानधन जमा झालेले नाही.





ते तातडीने प्रशासनाने जमा करावे,अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा ही यावेळी देण्यात आला.

दिगंबर सावंत म्हणाले की, बीएलओचे काम हे शिक्षकांच्यासाठी ऐच्छिक स्वरूपाचे आहे,तसे कोर्टाचे आदेश आहेत. मात्र तालुका प्रशासनाकडून जबरदस्तीने ऑर्डर काढून काम मात्र करून घेतले जाते.शिक्षक त्यांना सहकार्य करत,काम करतात.मात्र त्या कामाचा मोबदला देण्यात मात्र दिरंगाई केली जाते. 

Rate Card





शिक्षकांनी एखादी माहिती उशिरा सादर केली,तर लगेच नोटीस काढली जाते. तहसीलदार यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांना कोण नोटीस काढणार ?  लोकसभा व विधानसभेच्या वेळी काम केलेल्या शिक्षकांचे मानधन अद्याप जमा झालेले नाही.त्यासाठीचे पैसे संबधित विभागाकडे आले असूनही ते जमा होत नाही, चौकशी केली तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.असाच प्रकार राहिल्यास पुढील निवडणूकाच्या बीएलओ सारख्या अशैक्षणिक कामावर  बहिष्कार टाकू असा इशारा सांवत यांनी दिला आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.