डफळापूर |बिंळूर,देवनाळ कालव्यात पाणी कधी ? |

0
1

डफळापूर : डफळापूर परिसरातील देवनाळ व बिंळूर कलवा आवर्तन सुरू होऊन पंधरा दिवस झाले,तरीही कोरडे ठणठणीत आहे.पंधरा दिवसापासून परिसरातील शेतकरी पाणी मागणी करत आहेत.पंरतू पैसे भरल्याशिवाय पाणी देता येत नसल्याचे कारण सांगत म्हैशाळच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडलेले नाही.त्यामुळे पिके वाळत आहेत.अनेक गावात पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे.गत आवर्तनात मोठ्या प्रमाणात पाणी पट्टी वसूली करण्यात आली होती.मात्र भरलेल्या पानीपट्टीच्या निम्मेही पाणी आले नाही.तर काही गावातील बंधाऱ्यात पाणीच आले नाही.बाज,बेंळूखी, डफळापूर, मिरवाड गावालगतचे बंधारे भरलेच नाहीत.त्यामुळे गावभागात पाण्यासाठी टाहो फोडला जात आहे. जतच्या पुढे मंगळवेढा पर्यत पाणी पोहचविण्याची किमया साधणारे अधिकारी देवनाळ व बिंळूर कालव्यात पाणी सोडणार नाहीत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here