नवी दिल्ली : पंजाबच्या मुख्यमंत्री अमरिंदर सिंग पदावरून पायउतार झाल्यापासून राजकीय घडामोडीला वेग आला आहे.त्याचाच दुसरा भाग म्हणून बुधवारी मोठी बातमी आली आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे.गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची बैठक मोठ्या चर्चेला उधान आले आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असताना सर्वांचे लक्ष राज्याचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर होते. सिद्धूचा राजीनामा आणि पंजाबमधील नवीन मंत्र्यांना खात्यांचे वाटप झाल्यानंतर कॅप्टन मंगळवारी दिल्लीला पोहोचले. यासोबतच त्यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट घेतल्याने आता ते भाजपमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.काँग्रेसने 2022 मध्ये पंजाब निवडणुका जिंकल्या तरी नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही,असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.