जत तालुक्यात दसरा उत्साहात,ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न 

0
9
जत
संकेत टाइम्स

 

साडेतीन मुहूर्तपैकी एक असलेला दसरा पारंपारिकरित्या उत्साहात साजरा करण्यात आला.एकमेकांना आपट्यांची पाने देऊन नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी नसली तरी व्यवसायाला बऱ्यापैकी चालना मिळाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. कापड, वाहन क्षेत्रातही समाधानकारक व्यवहार झाले. मिठाईच्या दुकानातून मिठाई घेऊन नागरिकांनी दसरा गोड साजरा केला.विशेष म्हणजे वाहन व्यवसायात कार,मॉल या ठिकाणी देखील जुनी वाहने खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती.सराफ व्यवसायतही तेजी पाह्याला मिळाली.

 

तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी फुले, आपट्यांची पाने विकण्यासाठी नागरिक व्यवसाय करीत होती.व्यावसायिकांत उत्साह गेल्या सहा ते सात महिन्यापासून कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांनी दसरा उत्साहात साजरा केला. लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या व्यवसायाला यामुळे चालना मिळाली. नागरिकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर विविध वस्तूची खरेदी केल्याने व्यावसायिक वर्गाने समाधान व्यक्त केले.

 

जत तालुका संस्थानिक तालुका असल्याने अनेक गावात  ऐतिहासिक शस्ञाची पुजा करण्यात येतात.यंदा अपवाद वगळता ऐतिहासिक दसऱ्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.साधेपणाने सर्वत्र आनंद लुटण्यात आला.दरम्यान गेल्या नऊ दिवसात तालुक्यातील गुड्डापूरची श्री.धानम्मादेवी,बनाळीची बनशंकरी,जतची यल्लम्मा,अंबाबाई,डफळापूरची एकवीरा,खलाटीची लकाबाई या देवीच्या मंदिरात मोठी गर्दी पाह्याला मिळाली.

परंपरेचा वारसा जपत येळवीत मानाच्या तलवारीने  “दसरा-सिमोंल्लघन” कार्यक्रम संपन्न
 
मानाच्या तलवारीची पारंपारिक पद्धतीने वाजत- गाजत मिरवणुक काढत “दसरा सिमोल्लंघनचा” कार्यक्रम येळवी येथे पाटील परिवाराच्या वतीने पार पडला. या कार्यक्रमासाठी युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, बालचमुची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. पारंपारिक दसरा मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात साजरा होत असल्याचे उदाहरण म्हणजे येळवीचा “दसरा- सीमोल्लंघन” होय.
 
              
झेंडूची फुले महागली
दसऱ्याला झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. बाजारात उच्च दर्जाचा झेंडू महागला असून एक किलो 300 ते 400 रूपयाला विकत असतांना पाहायला मिळत होती. आपले घदेवीच्या इ.ची पुजा करून ग्रामीण भागात दसरा कोरोनाच्या सावटाखाली साजरा झाला. परंतु कोरोनामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण कमी प्रमाणात दिसून आले.
येळवी ता.जत येथे ऐतिहासिकतलावारीची मिरवणूक काढत पुजा करण्यात आली.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here