उमदी ठाण्याचा फोन नॉट रिचेबल

0
3

 

जत,संकेत टाइम्स : उमदी पोलीस ठाण्याचा कारभार कायम चर्चेचा विषय ठरत आहे. येथे‌ येणारा प्रत्येक अधिकारी,कर्मचारी वळणावर जात असल्याने आतातरी कारभार सुधारणार ही आशा फेल ठरत‌ आहे.आताही जूनीच स्थिती असून ठाण्याचा फोन अनेक वेळा तासन् तास नॉट रिचेबल किंवा तब्बल तासतासभर बिजी लागत असल्याने अनेक नागरिकांना समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

 

अनेकवेळा अपत्कालीन घटना घडली तर पोलीसाशी संपर्क करणे कठीण होत आहे. त्यामुळे ठाण्याच्या फोनसह ठाणेच दुरुस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.अन्यथा गुन्हेगारी,अवैध धंदे,लुट,गांज्या,वाळू,चंदन तस्करी,जूगार अड्डे,मटका यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार हे निश्चित झाले आहे.तालुक्यातील सीमावर्ती ‌अति संवेदनशील असलेल्या या भागात पोलीसांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकच असुरक्षित बनले आहेत.

 

नवे अधिकारी पुन्हा जून्याच वाटेने
उमदी पोलीस ठाण्याला नवे अधिकारी आल्यापासून आरोपाच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.माजी आमदार विलासराव जगताप यांनी जतेत उपोषण करून उमदी ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. गतवेळचे अधिकाऱ्यांच्या वरकमाईमुळे बिघडलेली परिस्थिती बदलण्यापेक्षा नवे अधिकारी त्याच वाटेने जात असल्याने आर्श्चर्य व्यक्त होत आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here