मुंबई : ‘जलयुक्त शिवार’ योजनेला पूर्णपणे क्लिनचिट नाही. ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लिनचिटवर राज्य सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे. जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या अनियमिततेबाबत एसआयटीमार्फत चौकशी सुरु असल्याचं राज्य सरकारनं म्हटलं आहे.
जलयुक्त योजनेतील 71 टक्के कामांमध्ये आर्थिक, प्रशासकीय अनियमितता झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. एसआयटीच्या अहवालाप्रमाणे शासनाने सर्व जिल्हाधिका-यांना चौकशीचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी SIT च्या निकषाप्रमाणे चौकशी अहवाल सादर केलेला नाही . ही सर्व चौकशी चालू असतांना शासनाने जलयुक्त शिवार अभियानाला क्लिनचिट देण्याचा प्रश्न येत नाही .




