देवदर्शनासाठी चाललेल्या कुंटुबावर नियतीचा घाला | दोन घटनेत तिघाचा मृत्यू

0
2

जत,संकेत टाइम्स : जत शहरालगतच्या जत साखर कारखान्याच्या गेटसमोरील राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत भिषण व विचित्र दोन वेगवेगळ्या अपघातात कुंभारीचा एकजण तर कर्नाटकातील दोघे असे तीघाचा जागीच मृत्यू झाला तर चोघे गंभीर जखमी झाले आहेत.

 

 

जत तालुक्यातील रविंद्र उर्फ ओंकार तातोबा माळी (वय २१,रा.कुंभारी) व याच ठिकाणी रात्री उशिराने झालेल्या अपघातात मुळ उमदी येथील तर सध्या कर्नाटकातील कनमडी येथे राहत असलेले प्रंशात प्रभाकर भोसले (वय २१) व त्याचा मुलगा मणिकांत प्रंशात भोसले (वय २)यांचा मृत्यू झाला आहे तर प्रंशातची आई, पत्नी,भाऊ,मुलगी जखमी झाले आहेत.

 

 

या दोन्ही अपघाताची जत पोलीसात नोंद झाली आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी,विजापूर-गुहागर या मार्गावर ऊसाने भरलेला ट्रक्टर जात असताना बुलेटने ट्रक्टरला धडक दिली.त्यात रविंद्र उर्फ ओंकार तातोबा माळी(वय २१) हा जागीच ठार झाला.तो टिवायबीए मध्ये शिकत होता.तर रात्री आकरा वाजणेच्या सुमारास प्रंशात भोसले हे कुंटुबियासह स्विफ्ट गाडीतून कनमडीहून पालीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी चालले होते.

 

पुढे वाहन आल्याने कारखाना गेटजवळ उभ्या असलेल्या ट्रँक्टरला त्यांच्या स्विफ्ट गाडीची भिषण धडक झाली.त्यात कारमधील प्रशांत प्रभाकर भोसले व त्यांचा दोन वर्षाचा मुलगा मनिकांत भोसले ( दोघे रा. कनमडी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर याच कुटूंबातील आई इंदुमती (65), भाऊ प्रवीण (28), पत्नी भाग्यश्री (30), मुलगी कार्तिकी (वय 6) असे जखमी झाले आहेत.

 

या भिषण अपघातात स्विफ्ट गाडीचा चक्काचूर झाला आहे. दोन्ही घटनेचा पंचनामा जत पोलीसांनी केला आहे. जत तालुक्यात रवीवारी जत-सांगोला महामार्गावरील भिषण अपघात ताजा असतानाच पुन्हा विजापूर-गुहागर मार्गावर दोन वेगवेगळे अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
देवदर्शनासाठी चाललेल्या कुंटुबावर नियतीचा घाला
कर्नाटकातील कनमडी येथील भोसले कुंटुबीय सातारा जिल्हातील खंडोबाच्या पालीला मुलाचे जावळ काढण्यासाठी चालले होते. मात्र समोर आलेल्या वाहनांमुळे ट्रॅक्टर थांबलेला न दिसल्याने हा अपघात घडला.दोघा मृताचे पहाटे शव विच्छेदन करुन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.जखमीवर उपचार सुरू आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here