जत,संकेत टाइम्स : महाराष्ट्र सरकार कडून सांगली जिल्ह्यातील ६ तालुक्यातील गट विकास अधिकारी यांना नवीन बोलेरो गाड्या प्रदान करण्यात आल्या.जत तालुक्याला देण्यात येणाऱ्या नवीन बोलेरो गाडीचे पूजन व वितरण जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे,जिल्हा बँक संचालक मन्सूर खतीब,जिल्हा परिषदेचेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गावडे,गट विकास अधिकारी दिनकर खरात,शिवाप्पा तांवशी, शंकर वगरे सर,राजू चौगुले,इराप्पा तांवशी,६ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी,कर्मचारी संघटनेचे दत्तात्रय शिंदे,बजरंग संकपाळ व जिल्हा परिषदेचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.