जत,संकेत टाइम्स : जत शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत लॅबोरेटरी चालु असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याने अधिकृत लॅबरोटरी यादी जाहीर करून अनधिकृत लॅबोरेटरीवर कारवाई करुन लोकांचे जीव वाचावेत,अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी लेखी निवेदनाद्वारे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,जत शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत लॅबोरेटरीचे नियमबाह्य पध्दतीने कामकाज सुरु आहे.महाराष्ट्र पॅरामेडिकल कॉन्सिलच्या मान्यताप्राप्त व्यक्तिला क्लिनिक लॅबोरेटरी चालविण्याचा परवाना दिला जातो. पण असे परवानाधारक लॅबोरेटरी संख्या कमी आहे. परंतु एखाद्या दवाखाण्यात अथवा लॅब मध्ये काम केलेला कर्मचारी लॅब चालू करत असल्याने रुग्णांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाले आहे. ज्या लॅबोरेटरीमध्ये जी व्यक्ती काम करते तीच व्यक्ती तपासणीसाठी उपस्थित पाहिजे.असा नियम असताना सध्या लॅबमध्ये असिस्टंट कर्मचारी लॅबचा कारभार बघत आहेत.
तसेच काही हॉस्पिटल मध्ये लॅबोरेटरी सुरु आहे. परंतु काम करणारा कर्मचारी परिपूर्ण शिकलेला आहे का? त्याचे रजिस्टेशन नोंदणी आहे. सर्टिफिकेट डिग्री आहे का? याची तपासणी करावी. काही अनधिकृत लॅबमध्ये आवश्यक त्या मशनरीच नाहीत मग रिपोर्ट कसले देतात याची तपासणी झाली पाहिजे पदवीधारक नसताना काही लॅब चालक बी. एस्सी. डी.एम.एल. टी. पदवीचा फलक लावून लॅब चा व्यवसाय करत आहेत आणि फी मनमानी पद्धतीने घेत आहेत याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे
सध्या कोरानाची रुग्णसंख्या वाढत असल्याने परवानाधारक लॅबोरेटरी यादी जाहिर करावी जेणेकरुन रुग्णांना सोईचे होईल. सध्या चालू असलेल्या लॅबोरेटरीची तपासणी करावी व बोगस अनधिकृत लॅबोरेटरीधारक यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करावी. अन्यथा आपल्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल याची नांद घ्यावी.असेही ढोणे यांनी म्हटले आहे.