ओंकार स्वरूपा फेस्टिवल 2021-22 उत्साहात संपन्न

0
15
येळवी,संकेत टाइम्स : येळवी ता.जत येथील ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्था येळवी संचलित ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडियम स्कूल अँण्ड ज्युनियर काॅलेज येळवी.या प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन “ओंकार स्वरूपा फेस्टिवल” उत्साहात संपन्न झाला.

 

दि.14 जानेवारी 2021 पारंपारिक वेश-भाषा दिवस (Traditional Day) साजरा करण्यात आला. त्याचबरोबर  याचदिवशी शेलापागोटे (fishpond Day) साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला जिल्हा बँक संचालक सरदार पाटील,पंचायत समिती सदस्य रविंद्र सावंत बनाळी यांनी भेट दिली. यावेळी संस्थेचे सचिव संतोष पाटील, भूपेंद्र कांबळे, आर आर कॉलेजचे प्राध्यापक सचिन लोखंडे,विजय रूपनूर,संस्थेचे सदस्य राजू कोळी,राजू कदम, प्राचार्य भारत निळ (सर), एस युनिट डान्स अकॅडमीचे शिक्षक सुरज मणेर(सर) तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..

 

त्याबरोबर दि.15 जानेवारी 2021 रोजी विविध कला गुणदर्शन स्पर्धा तसेच क्रीडा स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. विविध कला गुणदर्शन स्पर्धेत जवळपास 80 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. जवळपास 20 गाण्यावरती रेकॉर्ड डान्स बसवत विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

 

 

यावेळी येळवीचे उपसरपंच सुनील अंकलगी, प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार मारुती मदने,संतोष पोरे, ओंकार स्वरूपा संस्थेचे अध्यक्ष दिपक अंकलगी, संस्थेचे सचिव तथा ग्रा.पं .सदस्य संतोष पाटील तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here