माडग्याळ : माडग्याळ (ता.जत) येथील डॉ. सार्थक हिट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “सामाजिक सप्ताह” उपक्रमामध्ये मंगळवारी “हिट्टी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल संचलीत ब्लड स्टोरेज सेंटर”चे उद्घाटन जतचे सुप्रसिद्ध डॉक्टर शालिवाहन पट्टणशेट्टी यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ.शालिवाहन पट्टणशेट्टी म्हणाले,डॉ.सार्थक हिट्टी यांनी माडग्याळ सारख्या ग्रामीण भागात ब्लड स्टोरेज सुरू करून मोठे काम केले आहे. यापुर्वी भागातील रुग्णांना ५०-६० किलोमीटरील मिरज,सांगली येथे उपचारासाठी नेहावे लागत होते.डॉ.सार्थक हिट्टी यांचे हॉस्पिटल,रुग्णवाहिका,ब्लड स्टोरेज,ब्लड कम्पोनेंट मशनरी व हॉस्पिटल मधिल अत्याधुनिक सेवेमुळे तात्काळ उपचार मिळाल्याने रुग्णाचा पढील धोका टळू शकतो.तरूण वयात डॉ.सार्थक हिट्टी यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
डॉ.सार्थक हिट्टी म्हणाले,जत तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना आपल्या भागाच अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी माझे प्रयत्न आहेत.सामाजिक बांधिलकी जपत या भागातील लोकांना आम्ही चांगले उपचार मिळवून देत आहोत.यापुढे आणखीन चांगल्या सुविधा २४ तास देण्याचा माझा प्रयत्न राहील.ब्लड बँक टेक्निशियन नेताजी खरात हे काम पाहणार आहेत.
ब्लड स्टोरेजसाठी 9765575128,8888411458 जत पूर्व भागातील सर्व डॉक्टर्स,रुग्णांनी संपर्ककरावा असे आवाहन डॉ.सार्थक हिट्टी यांनी केले आहे.
माडग्याळ ता.जत हिट्टी मल्टीस्पेशालीटी हॅास्पिटल संचलीत ‘ब्लड स्टोरेज सेंटर’चे उद्घाटन जतचे सुप्रसिद्ध डॉ.शालीवाहन पट्टणशेट्टी यांच्याहस्ते संपन्न झाले.