आष्टा : आष्टा परिसरात दुचाकी चोरून विकण्यासाठी ग्राहकांच्या प्रतिक्षेत असलेल्या मुळ जत तालुक्यातील दिलीप लिंबाजी टोणे (वय २५,रा.टोणेवाडी कुणीकोणूर) या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे.त्याकडून चोरी केलेली एक होंडा शाईन दुचाकी जप्त केली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली कडील अधिकारी व अमंलदार असे खाजगी वाहनाने इस्लामपुर विभागात जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी या गुन्हयातील अभिलेख्यावरील आरोपी यांना चेक करीत पेट्रोलिंग करीत रेकॉर्डवरील आरोपी यांची माहिती घेत असताना, सागर टिगरे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की ,एक संशयीत इसम बिना नंबर प्लेटची शाईन मोटार सायकल घेऊन आष्टा बागणी रोडवरती ग्राहक शोधत आहे.
लाल रंगाची लोअर पॅन्ट घातलेला इसम दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने त्यास ताबेत घेवून त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव दिलीप लिंबाजी टोणे असे सांगितले, पोहेकॉ संदीप गुरव व पोलीस अमंलदार यांनी त्याचे कब्जातील होडा शाईन कंपनीची मोटार सायकल मिळून आले त्याबाबत त्यास विचारता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला त्यास विश्वासात घेवून विचारता त्याने सांगितले की, सदरची मोटार सायकल ही काकाची वाडी आष्टा येथून चोरी केली असल्याचे सांगितले. ज्यावेळी सदर घटने बाबत आष्टा पोलीस ठाणे येथे खात्री केली असता, आष्टा पोलीस ठाणेस गुरनं ३६/२०२२ भादविस कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले.
त्यावेळी त्याचे कब्जातील ५५ हजाराची एक होडा शाईन कंपनीची मोटार सायकल सविस्तर पंचनाम्याने जप्त करुन पुढील तपासकामी आष्टा पोलीस ठाणे येथे रिपोर्टने आरोपी मुदेमाल जमा
करणेत आला आहे.पोलीस निरिक्षक सर्जेराव गायकवाड व सहा.पोलीस निरिक्षक प्रशांत निशानदार यांच्या पथकांने ही कारवाई केली.