जत,संकेत टाइम्स : राज्यातील महाविकास आघाडीने जत तालुक्यातील ४२ गावांना नळपाणी
पुरवठा व्हावा, यासाठी जल जीवन मिशन योजनेतून ५२ कोटी तीन लाखाचा निधी मंजूर केला. हा निधी संबंधित विभागाला प्राप्त झाल्याची माहिती जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२३ गावाला कोटीहून अधिक निधी
तालुक्यातील बिळूर पाच कोटी,उटगी तीन कोटी ५० लाख, करजगी दोन कोटी ३५ लाख,जाडरबोबलाद दोन कोटी ४७ लाख, रावळगुंडवाडी एक कोटी ३३ लाख, उंटवाडी एक कोटी सहा लाख, वजरवाडला एक कोटी ३५ लाख, जालिहाळ (बु.) एक निगडी (बु) एक
कोटी २० लाख, बसर्गी एक कोटी,
कोटी १७ लाख. सनमडी एक
कोटी ४७ लाख,
अंकलगी एक कोटी ८४ लाख, बालगाव एक कोटी ११ लाख, कुलाळवाडी एक कोटी ३० लाख, मोरवगी एक कोटी ६२ लाख, कागनरी दीड कोटी, दरीकोणूर एक कोटी १० लाख, कुणीकोनूर एक कोटी ६७ लाख, भिवर्गी एक कोटी ८२ लाख, वाषाण एक कोटी ७६ लाख, लवंगा एक कोटी ८९ लाख,
कंठी एक कोटी ३८ लाख , शिंगणहळ्ळी एक कोटी ३२ लाखाचा निधी प्राप्त झाला आहे.
तालुक्यातील येळवी ८४ लाख,गुलगुंजनाळ ३७ लाख, तिप्पेहळ्ळी ४९लाख, तिल्याळ ६१ लाख, एकुंडी ९५ लाख, गुड्डापूर ३१ लाख, आसंगी जत
७१ लाख, हिवरे ५५ लाख, खलाटी ८३ लाख, लमाणतांडा (द.ब.) ६७ लाख, माणिकनाळ ६९ लाख, मेंढीगिरी ८० लाख, मोटेवाडी (को. बो.) २८ लाख, सिद्धनाथ ३१ लाख, बागलवाडी २० लाख, आसंगी (तुर्क) ६४ लाख,शिंगणापूर ८७ लाख, वेळदरी ८२ लाख,कासलिंगवाडी ७४ लाखाचा निधी प्राप्त झाल्याचे आ. सावंत यांनी सांगितले.