त्यांना थकबाकी आणि एनपीएमधील फरक कळत नाही, हे अज्ञान ; आमदार विक्रमसिंह सांवत

0
10
जत, संकेत टाइम्स : माजी आमदार विलासराव जगताप यांनी जिल्हा बँकेचे संचालक तसेच राज्य सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून काम पाहिले आहेत. मी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३५ लाखाचे कर्ज काढले असून काही प्रमाणात थकबाकी असेल पण माझे खाते एनपीए मध्ये नसून ज्यांना थकबाकी आणि एनपीए मधला फरक कळत नाही हेच विलासराव जगताप यांचे अज्ञान असल्याचा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत येथे आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत लगावला.

 

 

यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष आप्पाराय बिराजदार, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील ,जि प सदस्य महादेव पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडग, बाजार समितीचे संचालक अभिजीत चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,माजी सरपंच मारुती पवार,गणी मुल्ला, ॲड.युवराज निकम, गटनेते साहेबराव कोळी , माजी बांधकाम सभापती नामदेव काळे ,माजी नगरसेवक परशुराम मोरे, माजी नगरसेवक महादेव कोळी, माजी नगरसेवक निलेश बामणे, अशोक बन्नेनवर, संतोष भोसले, अप्पू माळी, तुकाराम माळी सर, आदी उपस्थित होते.

 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सावंत म्हणाले की माझे कर्ज खाते चालू असून एखादा हप्ता थकला असेल असे सांगत त्यांनी आपल्या कर्ज खात्याचे स्टेटमेंट समोर ठेवले.त्यामुळे विरोधकांच्या पोटत पोट शुळ उठले आहे. विलासराव जगताप यांनी बिनबुडाचे आरोप करणे बंद करावे. पण या तालुक्यातील जनता सुज्ञ असून .त्यांच्या भूलथापांना जनता कधी बळी पडणार नाही.

 

जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब हे राजहंस विणकर यंत्रमाग संस्थेचे सभासद व संचालक असून ते थकबाकीदार आहेत .त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढला असून या बाबत माजी आमदार विलासराव जगताप यांनी भूमिका स्पष्ट करावी. मगच माझ्यावर त्यांनी आरोप करावे असे सांगत. जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे साडेनऊ कोटी कर्ज जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर केल्याचे कागांवा करत आहेत, असे आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here