मिरज : आरग येथे मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट.आमदार माजी मंत्री.आ. सुरेशभाऊ खाडे यांचे वडील स्वर्गीय दगडू तायप्पा खाडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ निम्मित आरोग्य महाशिबर संपन्न झाले.या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन खासदार संजयकाका पाटील याच्यांहस्ते संपन्न झाले.
शिबिराचा ६३० गरजू रुग्णांनी घेतला लाभ घेतला.
आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी आरोग्य महाशिबीर आयोजित करण्यात येते. त्यामुळे या शिबिराचा लाभ हा समाजातील गरजू रुग्णांना होतो. वैद्यकीय तपासणी, पुरेसा औषधोपचार आणि मोफत वैद्यकीय सल्ला या गोष्टी फक्त महाआरोग्य शिबिरातच मिळत असतात असे प्रतिपादन खा.पाटील यांनी केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जि.प.सदस्या सौ. सरिताताई कोरबू, जि.प.सदस्य मनोजकुमार मुंडगनूर, जि.प.सदस्या सौ.मनिषाताई पाटील, जि.प.सदस्या सौ.शोभाताई कांबळे, पंचायत समिती सभापती सौ.पुनमताई कोळी, सौ.गीतांजली कणसे, माजी उपसभापती विक्रम पाटील, काकासाहेब धामणे, राहूल सकळे, कृष्णदेव कांबळे आनंदा भोई, तुकाराम काका पाटील, गोविंद तात्या पाटील, सागर साहेब वडगावे, कृषी बाजार समिती सांगली संचालक उमेश भाऊ पाटील, परशुराम नागरगोजे, आरगचे सरपंच सौ.सुरेखा नाईक, खटाव सरपंच सुजाताताई व्हनन्नावर, आरग वि.सो.चेअरमन रामभाऊ यवलुजे, व्हा.चेअरमन संजय गावडे, उपसरपंच सुभाष खोत आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन चिकुर्डेकर आणि सर्व आशा सेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला. एकूण ६३० गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला. त्वचारोग, आस्थी रोग, नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, बाल तज्ञ रोग,रक्त लघवी तपासणी आदी तपासण्या यावेळी मोफत करण्यात आल्या.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग व इंडियन मेडिकल असोसिएशन, सिनर्जी हाॅस्पीटल मिरज, सेवासदन हॉस्पिटल, आदित्य हॉस्पिटल, विवेकानंद हॉस्पिटल कुपवाड आधी खाजगी रुग्णालयांनी यावेळी मोठा सहभाग घेतला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दूडी यांनी या शिबिरास विशेष सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच सुभाष खोत यांनी केले. जिल्हा परिषद सदस्या सौ.सरिताताई कोरबू यांनी मनोगत व्यक्त केले. आभार डॉ. नितीन चिकुर्डेकर तर सूत्रसंचालन पांडुरंग कुंभार यांनी केले. या आरोग्य शिबिराचे संयोजन जिल्हा परिषद सांगली आणि पंचायत समिती मिरज यांनी केले.
हे शिबिर यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी मनन कंट्रक्शनचे सर्वेसर्वा सागरसाहेब वडगावे, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नितीन चिकुर्डेकर आरोग्य सेवक मोहन शिरदवडे व सर्व कर्मचारी आशा सेविका आणि गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मोठा सहभाग घेतला.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी विजय सावंत, सचिन तळंदगे, महेश मोरे, दिपक जाधव, सर्जेराव खटावे डॉ.अनिल कोरबू , डॉ.विवेक जाधव, सचिन पाटील, प्रशांत गायकवाड, अशोक सुतार, जयपाल कांबळे, .संदिप नाईक, शुभम पाटील, बबन सोनंदकर, वैभव कोरे, ग्रामसेवक नागेश कोरे कोरे, सर्व आशा सेविका आणि आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.