साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम | राज्यात कोल्हापूर, सांगलीचा वाटा सर्वाधिक

0
6
सांगली,संकेत टाइम्स : ऊस पिकाची विश्वासअर्हता वाढत चालली असून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून ऊसाची एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना वेळेवर देण्यासाठी साखर आयुक्तालय सातत्याने प्रयत्न करीत आहे. या स्थितीत वाढत्या साखर उत्पादनामुळे महाराष्ट्राने चीन, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या सर्व देशांपेक्षा जास्त साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. ब्राझीलबरोबर महाराष्ट्र ऊस व इथेनॉल उत्पादनाबाबत स्पर्धा करत आहे.

 

महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याची ही नांदी आहे, असे प्रतिपादन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले. चालू वर्षी महाराष्ट्राने ऊस गाळप, साखर उत्पादनात देशात प्रथम क्रमांक मिळवला असून सन २०२१-२२ मध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रात  ११ कोटी १२ लाख ३४ हजार मेट्रीक टन ऊस गाळप तर ११ कोटी ५४ लाख १८ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. चालू वर्षी १०.३८ टक्के साखर उतारा मिळाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
साखर आयुक्तक शेखर गायकवाड याबाबत अधिक माहिती देताना म्हाणाले, देशात साखर उत्पादनात मागील दोन ते तीन वर्षे उत्तरप्रदेश अग्रस्थानी होते. तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी राहिला होता. हे चित्र चालू वर्षी बदलले असून महाराष्ट्राने ऊस गाळप  आणि साखर उत्पादनात उत्तरप्रदेशला मागे टाकत देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. उत्तरप्रदेशमध्ये ७ कोटी ६८ लाख मेट्रीक टन ऊस गाळप तर सुमारे ८० लाख मेट्रीक टन साखर उत्पादन झाले आहे. तर महाराष्ट्राने ११ कोटी १२ लाख ३४ हजार मेट्रीक टन ऊस गाळपातून ११ कोटी ५४ लाख १८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. महाराष्ट्रा ने उत्तरप्रदेशच्या तुलनेत सुमारे ३५ लाख क्विंटलहून अधिक साखरेचे जादा उत्पाउदन  घेतले आहे.

 

 

देशपातळीवर चालू वर्षी ३ केाटी ४७ लाख मेट्रीक टन साखर उत्पाादन होण्याचची अपेक्षा आहे. त्या३मध्येर महाराष्ट्राीचा वाटा १ कोटी २५ लाख मेट्रीक टन राहील. तसेच देशाच्याह साखर उत्पा्दनात महाराष्ट्रा चा  हिस्सा  वाढून तो जवळपास ३९ टक्या घे वर पोहोचेल असा  विश्वाटसही त्यांशनी यावेळी व्यउक्तप केला.
 साखर उत्पादनात देशात महाराष्ट्र प्रथम तर राज्यात कोल्हापूर विभाग अग्रेसर आहे. महाराष्ट्राचे एकूण साखर उत्पादन ११ कोटी ५४ लाख १८ हजार क्विंटल असून यामध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्याने २ कोटी ८८ लाख ७९ हजार ७१२  क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. महाराष्ट्रात साखरेचा सर्वाधिक म्हणजे ११.७५ टक्के उतारा कोल्हापूर विभागात मिळाला आहे.

 

सन २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात सहकारी तत्वावरील ९८ तर खाजगी तत्वावरील ९९ असे एकूण १९७ साखर कारखान्यांचे हंगाम सुरू झाले होते. यामध्ये कोल्हापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २९, सोलापूर विभागातील ४६, अहमदनगर विभागातील २७, औरंगाबाद विभागातील २५, नांदेड २७, अमरावती ३ व नागपूर विभागातील ४ अशा साखर कारखान्यांचा समावेश आहे.

 

या हंगामामध्ये कोल्हापूर विभागात एकूण २ कोटी ४५ लाख ६८ हजार ४५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप होवून २ कोटी ८८ लाख ७९ हजार ७१२  क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे. पुणे विभागात एकूण २ कोटी २६ लाख ७७ हजार ५५३ मेट्रीक टन ऊसाचे गाळप होवून २ कोटी ४० लाख ८६ हजार ७४५  क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे. सोलापूर विभागात एकूण २ कोटी ६१ लाख ९ हजार २७४ मेट्रीक टन ऊसाचे गाळप होवून २ कोटी ४५ लाख ३ हजार ४० क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे. अहमदनगर विभागात एकूण १ कोटी ५५ लाख ९५ हजार ७७ मेट्रीक टन ऊसाचे गाळप होवून १ कोटी ५४ लाख ७७ हजार ४८५  क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे.

 

औरंगाबाद विभागात एकूण ९६ लाख ७० हजार ३८० मेट्रीक टन ऊसाचे गाळप होवून ९५ लाख ९ हजार १९०  क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे. नांदेड विभागात एकूण १ कोटी १२ लाख ५९ हजार ८७१ मेट्रीक टन ऊसाचे गाळप होवून १ कोटी १७ लाख ८४ हजार ५२५  क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे. अमरावती विभागात एकूण  ८ लाख ९ हजार ४६० मेट्रीक टन ऊसाचे गाळप होवून ७ लाख ६४ हजार ७२५  क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे. नागपूर विभागात एकूण ४ लाख १२ हजार २०५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप होवून ३ लाख ५६ हजार ७६०  क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here