अज्ञात डंपरने धडक दिल्याने दुचाकीवरील पिता-पुत्र ठार

0
6
सांगली : पेठ-सांगली रस्त्यावरील गोटखिंडी (ता. वाळवा) फाट्याजवळील वळणावर अज्ञात डंपरने दुचाकीस उडविल्याने  १३ वर्षाच्या मुलासह वडीलाचा जागीच मृत्यू झाला आहे. अंकुश शिवाजी साळुंखे (वय ४०) व आदित्य शिवाजी साळुंखे (१३, रा. हजारमाची, राजारामनगर, कऱ्हाड) अशी मृत पिता-पुत्राची नावे आहेत. अपघातात अंकुश यांची पत्नी सोनाली अंकुश साळुंखे (३६) या गंभीर जखमी झाल्या आहेत.अपघातानंतर अज्ञात डंपरचालक वाहनासह पसार झाला.

याबाबत माहिती अशी की, हजारमाची येथील बांधकाम व्यावसायिक असलेले अंकुश साळुंखे पत्नी साेनाली व मुलगा आदित्यसह सांगलीला नातेवाईकांकडे गेले हाेते. सकाळी ते दुचाकीवरुन (क्र. एमएच ५० आर १६७६) हजारवाडीकडे परतत हाेते. सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान गाेटखिंडी फाट्याच्या पुर्वेकडील वळणावर समाेरुन भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीस जाेरदार धडक दिली. अपघातात अंकुश व आदित्य जागीच ठार झाले.

अपघात एवढा भीषण हाेता की अंकुश यांचे शीर शरिरापासून वेगळे होऊन धडक दिलेल्या वाहनाबरोबर गेले होते, तर आदित्य याच्याही डोक्यावरून वाहन गेल्याने त्याचेही डोके दिसत नव्हते. अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या अंकुश यांच्या पत्नी साेनाली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तात्काळ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर अज्ञात डंपरचा चालक वाहनासह घटनास्थळावरुन पसार झाला.

अपघाताची माहिती मिळताच आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद व पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीचे डंपरचालकाचा शाेध सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here