डफळापूर, संकेत टाइम्स : बेंळूखी सर्व सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी महादेव माळी तर व्हा.चेअरमनपदी चंद्रकांत चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.जेष्ठ नेते शंशिकात जाधव शेठ यांच्या नेतृत्वाखालील पँनेलने ९ जागा जिंकत सत्ता मिळविली आहे.
बुधवारी निवडी पार पडल्या.निवडीनंतर फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.सर्व नुतन पदाधिकारी,संचालक,नेते,प्रमुख कार्यकर्त्याचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.बेंळूखी सोसायटीत १५ वर्षानंतर संत्तातर करण्यात शंशिकात जाधव शेठ यांनी पँनेल लावण्यापासून तोडीस तोड उमेदवार उभे केले होते.गत तीन्ही वेळेला जाधव यांच्या गटाला विजयाने हुलकावनी दिली होती.मात्र यंदा अटीतटीने झालेल्या या निवडणूकीत १३ पैंकी ९ जागा जिंकत निर्विवाद यश मिळविण्याची किमया साधली आहे.
किमयागार शंशिकात जाधव शेठ
बेंळूखीतील राजकारणातील किमयागार म्हणून शंशिकात शेठ जाधव यांचे नाव पुन्हा आधोरेखित झाले आहे.गत ग्रामपंचायत निवडणूकीत समीकरणे बदलानंतर जाधव यांनी विरोधी गटाचे प्रमुख असलेले महादेव माळी यांना आपल्या गटात घेत विजयी पताका उभारली आहे.
शब्द खरा केला
निवडणूकीपुर्व झालेल्या बैठकित जाधव यांनी महादेव माळी यांना सोसायटीत चेअरमन करू असा शब्द दिला होता.तो त्यांनी माळी यांची बिनविरोध निवड करून खरा केला आहे.
पुढील लक्ष ग्रामपंचायत
बेंळूखी सोसायटी निवडणूकीनंतर लवकरचं ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. यावेळी ग्रामपंचायतीलाही जाधव यांच्या नेतृत्वाखालील तगडे पँनेल असेल.त्यादृष्टीने जोडण्याही सुरू झाल्या आहेत.
पारदर्शी कारभार असेल ; जाधवगत पंधरा वर्षानंतर आम्ही सोसायटीत सत्ता मिळविली आहे.सभासदांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू,सोसायटीत पारदर्शी कारभार करू,नवे सभासद,शेतकऱ्यांना कर्ज वाटपात कोणतेही भेदभाव नसतील.आमचे पदाधिकारी सभासदाचे हिताला प्राधान्य देतील.गावासह शेतकरी समृध्द करण्याचा माझा प्रयत्न राहिल.या निवडणूकीत आजी-माजी संरपच,आजी-माजी चेअरमन,सर्व कार्यकर्ते,ग्रामस्थ व युवकांनी दिलेल्या योगदानामुळे हे यश आम्ही मिळवू शकलो आहे,पँनेलला मदत केलेल्या सर्वाचे आभारी आहोत.– शंशिकात जाधव शेठपँनेल प्रमुख,बेंळूखी