वीज तोडण्याची भिती दाखवून चार लाखाला गंडा

0
2

पुणे : वीज तोडण्याची भीती घालून सामान्यांना गंडा घालण्याचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी विश्रांतवाडी भागातील एका नागरिकाला वीज तोडण्याची भीती घालून चार लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राथमिक तपासात सायबर चोरटे बिहारमधील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तक्रारदार धानोरी भागात राहायला आहेत. तक्रारदाराच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. वीज देयक न भरल्यास वीज कापण्यात येईल, असे संदेशात म्हटले होते.

 

त्यानंतर तक्रारदाराने चोरट्यांनी संदेशात दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. चोरट्यांनी महावितरणमधील अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here