सोसायट्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अर्थवाहिन्या ठराव्यात ; प्रकाश जमदाडे

0
3
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील सर्व सेवा सोसायट्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अर्थवाहिन्या ठराव्यात, जिल्हा बँकेकडून आम्ही सर्वोत्तरी प्रयत्न करत आहोत,असे उद्गार जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे यांनी काढले. बसर्गी ता.जत सर्व सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी चंद्रकांत बामणे व व्हा.चेअरमन पदी शिवानंद पटेद यांची बिनविरोध निवड झाली.जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

वज्रवाड सर्व सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी चिदानंद चौगुले व व्हा.चेअरमनपदी चिंतामणी ब्लीगिडी यांचीही निवड झाल्याबद्दल त्याचाही सत्कार जमदाडे यांनी केला.त्याशिवाय नुतन संचालकांचाही सत्कार करण्यात आला. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सर्व ती मदत करणेची ग्वाही जमदाडे यांनी दिली.

 

यावेळी बसर्गीचे नेते शिवाप्पा तावसी,माजी जि प सदस्य व गुरुबसवेश्वर सोसाईटी बिळूरचे चेअरमन रामण्णा जिवण्णावर ,माजी चेअरमन बसगोंडा जबगोंड, इराना पाटील ,मन्सूर शेख व सभासद शेतकरी उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here