सांगली : पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील लक्ष्मी शिंदे व बाळकृष्ण शिंदे या दाम्पत्यांनी मुळशीतील वातुंडे गावातील शेतात भात रोपांची हिरवीगार १२० फूट लांब विठ्ठलाची मूर्ती साकारली आहे.
१० जुलै रोजी सर्वत्र आषाढी एकादशी साजरी होणार असून,सध्या पंढरीची वारी सुरू असतानाच भात रोपांद्वारे तयार झालेले हे विठ्ठलाचे रुप पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.बाळकृष्ण शिंदे यांनी आपल्या शेतात १२० फूट लांब आणि ६० फूट रुंद उंचीचा पांडुरंगरुपी भात उगवून विठ्ठलाची मूर्ती साकारली आहे.
सिव्हिल इंजिनिअर असलेल्या बाळकृष्ण शिंदे यांनी सुरुवातीला ॲटोकॅडमध्ये डिझाईन तयार केले.ते जमिनीवर रेखाटून त्यावर फक्की टाकली.त्यामध्ये भाताच्या रोपांची विठ्ठलरुपी पेरणी केली.आता पाऊस होताच या हिरवागार विठ्ठलाचे दर्शन होत आहे.