जत तालुक्यात ३० जून अखेर जिल्हा बँकेची ५३ टक्के वसूली ; प्रकाश जमदाडे,मन्सूर खतीब यांची माहिती ; चार शाखाच्या फर्निचर दुरूस्तीसाठी सव्वा कोटी मंजूर

0
36
जत,संकेत टाइम्स : ३० जून अखेर तालुक्यातील ८२ सोसायटीत ५३ टक्के अशी मोठी वसूली झाली आहे.बँक पातळीवरती ८ सेवा सोसाट्याची १०० टक्के वसूली झाली आहे.४३ सोसायट्याची ६० टक्के वर वसूली झाली आहे,तर १ सोसायटी सभासद पातळीवरती १०० टक्के वसुली झाली आहे.जत तालुक्यातील २५ शाखात मिळून ४६५ कोटी ठेवी असून जवळपास ३७,००० सभासदाना ३५५ कोटी कर्ज वाटप करण्यात आले आहे.

प्रकाश जमदाडे, जिल्हा बँक संचालक

सन २००१ पासून अवेळी पाऊस, दुष्काळ, गारपीठ व हवामान याचेमुळे शेतकऱ्यांना म्हणावे तितके उत्पन्न न मिळालेले नाही. शेतकऱ्यांना बँकेने या काळात पीक कर्ज, अल्प मुदत व दिर्घ मुदतीचे जवळपास ३५५ कोटी कर्ज वाटप केले होते,मात्र यातील ३,६८९ शेतकरी सभासद थकबाकीदार झाले होते. त्यांचेकडे ५५.५६ कोटी थकीत आहेत.यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने २२ मार्च २०२२ पासून कर्ज प्रोत्साहन निधी योजना“( O.T.S.)” आणली होती,त्यामध्ये ८६४ शेतकऱ्यांनी भाग घेऊन जवळपास १३ कोटी मुद्दल व ७ कोटी व्याज भरणा केलेला आहे.मात्र चांगली योजना असतानाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. बँक स्थापनेपासून अशा प्रकारची OTS योजना स्वनिधीतून व्याज परतावा ही देणे हे प्रथमच घडले आहे.

 

बँकेने गरजू शेतकरी यांना सुरक्षित बेरोजगार युवकांना शेतीला पुरक व्यवसाय असणाऱ्या दुध व्यवसायासाठी बँकने नवी योजना आणली आहे त्याही फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बँकेकडून आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास वर्गीय विकास महामंडळ,महात्मा फुले मागास वर्गीय विकास महामंडळ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,इतर मागास वर्गीय विकास महामंडळ,वंसतराव नाईक व्ही. जे. एन. टी. विकास महामंडळ,संत रोहितदास विकास महामंडळ अशा महामंडळा अंतर्गत कर्ज पुरवठा करणेत येणार आहे.
यातील काही महामंडळाकडून व्याज परतावा आहे तर काही महामंडळे अनुदान देतात. त्यांचबरोबर बचतगटासाठी ७.५० टक्के व्याजाने १ लाख, २ लाख, व ३ लाख कर्ज पुरवठा सुलभ पध्दतीने केला जात आहे.त्यांचाही लाभ घ्यावा,असे आवाहनही जमदाडे,खतीब यांनी केले आहे.
जत तालुक्यातील शाखातील फर्निचरसाठी सव्वा 
जत तालुक्यातील शाखेतील फर्निचर व दुरूस्ती करणेसाठी चार शाखांना १.१५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.त्यात जत मार्केट यार्ड शाखा ८० लाख,शेंगाव शाखा १६ लाख, डफळापूर शाखा ११, लाख व रावळगुंडवाडी ७ लाख.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here