जत,संकेत टाइम्स : जाड्डरबोबलाद (ता.जत) येथे खाजगी वाहन चालकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना समोर आली आहे.श्रीशैल निलाप्पा सायगाव (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून उमदी पोलिसांचा तपास सुरु आहे.
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि,जात तालुक्यातील जाडरबोबलाद – मारोळी रस्त्यालगतच्या ओढा पात्रात एका व्यक्तीचा खून करून मृतदेह टाकण्यात आला असल्याचे उघडकीस आले. तपासानंतर श्रीशैल सायगाव यांचा खून झाल्याचे समोर आले. अतिशय निर्घृण पणे तोंड, डोके ठेचून खून करून टाकला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले.
ही घटना रविवारी मध्यरात्री घडली असावी,मृतदेहाजवळ रक्तांनी माखलेली कपड्याची पिशवी मिळून आली आहे. हा खून अन्यत्र
करून तो इथे आणून टाकला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी भेट दिली आहे, पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.