सीबीआय कडून मोठी कारवाई, उद्योगपती अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टर जप्त

0
8

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना सीबीआयकडून पुन्हा धक्का बसला आहे. भोसले यांचे हेलिकॉप्टर काल सीबीआयकडून जप्त करण्यात आले आहे. अविनाश भोसले येस बँक आणि डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात अटकेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सीबीआय भोसले यांची चौकशी करत आहे.

 

हेअविनाश भोसले हे पुण्यातील बांधकाम व्यवसायातील मोठे नाव आहे. ते सध्या अटकेत आहेत. डीएचएफएल आणि येस बँकेशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अविनाश भोसले यांना अटक केली आहे. याआधी सोमवारीच सीबीआयने त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

अविनाश भोसले यांना २६ मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने भोसले यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांचे खासगी हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here