आज‌ अवतरणार गणराज्य | तयारी पुर्ण : दोन वर्षांनंतर करोनाच्या सावटाशिवाय गणेशोत्सव

0
4
जत,संकेत टाइम्स : आज ३१ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पा विराजमान होत आहेत. अवघे राज्य बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. करोनानंतर पहिल्यांदाच निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्याच्या विविध भागात तयारीला वेग आला आहे.घरोघरीसह सार्वजनिक मंडळांचे बाप्पा विराजमान होणार आहेत.

सर्वत्र महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी गेल्या एक महिन्यापासून अधिक काळ सुरु होती. भाद्रपद महीना सुरु झाला आणि या तयारीने आणखीनच वेग घेतला होता. अखेर भाद्रपद शुध्द चतुर्थीला म्हणजेच बुधवार ३१ ऑगस्ट रोजी गणरायाची भावपूर्ण वातावरणात स्थापना करण्यात येणार आहे.

गतवर्षी सर्वच सण करोनाच्या निर्बंधांखाली गेले. कोकणातला सर्वात मोठा सण सरकारच्या नियमांच्या अधीन राहून कोकणवासीयांना साजरे करावे लागले. यावर्षी निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, मंगळवार पासूनच बाप्पांची मूर्ती घरी नेऊन ठेवण्याची गणेश भक्तांची लगबग सुरु झाली असून बाजारपेठही खरेदीसाठी गर्दीने फुलून गेल्या आहेत.आज सकाळपासून गणराज्य अवतरणार आहे.गणेश मुर्तीचे बुकिंग झाले आहे.सकाळी सात वाजल्यापासून गणेशाचे आगमन होणार आहे.पुढील आकरा दिवस भक्तीचा गजर घरोघरी,गावोगावी होणार आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here