जत : शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी व सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी या स्पर्धा जत येथील शाळा क्रमांक 1 येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत प्राथमिक गटात चव्हाणवस्ती शाळा क्रमांक 1 चे शिक्षक राजू सुखदेव आटपाडकर यांच्या आणि उच्च प्राथमिक गटात श्रीकांत सोनार यांच्या शैक्षणिक साहित्यास जत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाला.
जत पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा शिवाजी पेठेतील शाळा क्रमांक 1 येथे पार पडल्या. त्यामध्ये प्राथमिक गट 1 ते 5 द्वीशिक्षकी गटात एकूण 6 शिक्षक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. तर उच्च प्राथमिक गट 1 ते 8 बहुशिक्षकी गटात 12 स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच तंत्रज्ञानावर आधारित साहित्य असणाऱ्या शाळा 1 ते 8 या गटात एकूण चार स्पर्धकांनी भाग घेतला होता. उच्च प्राथमिक गट 1 ते 8 बहुशिक्षकी या गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काराजनगीचे शिक्षक श्रीकांत शंकर सोनार यांच्या साहित्याला प्रथम क्रमांक तर मिरवाडच्या सहशिक्षिका श्रीमती मकानदार आणि वाळेखिंडीच्या सहशिक्षिका श्रीमती रिहाना अजीम नदाफ यांच्या साहित्याला अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला.
प्राथमिक गट 1 ते 5 द्विशिक्षकी या गटात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं 1 चव्हाणवस्ती (डफळापूर)चे सहशिक्षक राजू सुखदेव आटपाडकर, कन्नड शाळा माळीवस्ती (अंकलगी)चे शिक्षक रवींद्र निंगाणा सतारी व मासाळवस्ती (दरीबडची)चे शिक्षक महेंद्र लक्ष्मण बागुल यांच्या साहित्याला अनुक्रमे पाहिले तीन क्रमांक मिळाले. तंत्रज्ञानावर आधारित साहित्य असणाऱ्या शाळांच्या गटात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा चव्हाणवस्ती नंबर 1 (डफळापुर) चे शिक्षक राजू सुखदेव आटपाडकर प्रथम क्रमांक,उर्दू शाळा बिळूरच्या सहशिक्षिका श्रीमती समीना खलिफा द्वितीय क्रमांक आणि तर वाळेखिंडीच्या सहशिक्षिका श्रीमती रिहाना अजीम नदाफ यांच्या साहित्याला तृतीय क्रमांक मिळाला.
पर्यवेक्षक म्हणून रमेश वाळवेकर, श्री पाटील सर, रमेश राठोड यांनी काम पाहिले. स्पर्धेचे नियोजन गटशिक्षणाधिकारी श्री. साळुंखे, विस्तार अधिकारी अन्सार शेख, तानाजी गवारी, केंद्रप्रमुख संभाजी कोडग, बिराप्पा पारेकर,जयवंत वळवी, श्री बेले, श्री शिंदे, श्री हिरेमठ, रतन जगताप आदींनी केले.
–