जत,संकेत टाइम्स : जत २८८ विधानसभा मतदार संघात बाळासाहेबांची शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन करत नवे संपर्क प्रमुख ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक योगेश जानकर यांचे स्वागत करण्यात आले.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून राज्यभर मोर्चेबांधणी सुरू आहे.
जत तालुक्यातही शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जतवर लक्ष केंद्रित केले आहे.त्यांनी त्यांचे निकटवर्ती असणारे योगेश जानकर यांच्यावर जत तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे.
शनिवारी योगेश जानकर यांनी जत तालुक्याचा दौरा केला.डफळापूर येथून सुरू झालेल्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला.डफळापूर येथील ग्रामदैवत श्री.बुवानंद दर्ग्याचे दर्शन घेऊन जानकर यांनी जत तालुक्यात प्रवेश केला.खलाटीची श्री लक्ष्मीआई,जतचे चिनगीबाबा,श्री.यल्लम्मा देवीचे दर्शन घेत त्यांनी जतेत रणशिंग फुकले आहे.
जतमधिल प्रवेशाप्रंसगीच जानकर यांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.डफळापूर येथे अनेक पक्षाच्या जेष्ठ,युवा नेत्यांनी त्यांचा सत्कार करत स्वागत केले.जत येथे झालेल्या बैठकीलाही चांगला प्रतिसाद मिळाला तेथे मोठ्या संख्येने पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
योगेश जानकर म्हणाले,जत तालुक्याचे राजकारण आतापर्यत पाण्यावर चालले आहे.मी त्या मुद्यापेक्षा मोठ्या संख्येने असलेल्या बेरोजगार,ऊसतोड मजूरांच्या हाताला काम मिळावे यासाठी पंचताराकिंत एमआयडीसी,गाव,शहराच्या विकास,शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याला प्राधान्य देणार आहे.सांगण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष काम करून दाखविणार आहे.जत शहरात तालुक्याचे संपर्क कार्यालय लवकरचं सुरू करणार आहोत.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम असलेला जत हा दुष्काळी तालुका आहे.त्यांच्या विचाराने प्रेरित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो विचार पुढे नेहण्यासाठी माझ्यावर जतची जबाबदारी दिली आहे.
जत तालुक्यातील ग्रामपंचायत,स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषदेसह सर्व निवडणूका बाळासाहेबाची शिवसेना(शिंदे गट) लढविणार आहोत.प्रत्येक गाव,प्रभागात शाखा आम्ही काढणार आहोत,जेष्ठ,युवक,महिलां यांचे मजबूत संघटन करण्यासाठी मी स्वत: त्यांच्या बरोबर गावागावात पोहचणार आहे,असेही जानकर म्हणाले.