कवठेमहांकाळ : महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवा ग्राम आणि युनीसेफ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.सुबोध गुप्ता प्राचार्य प्रकल्प इन्वेस्टीगेटर यांच्या आरंभ रिसर्च अभ्यासक्रमातून ० ते ३ वयोगटातील बालकांसाठी हे आरंभ प्रशिक्षण देण्यात येत आहे.हेच प्रशिक्षण आज कवठे महांकाळ तालुक्यातील अंगणवाडी क्रमांक ८६ येथे आयोजित करण्यात आले होते.
बालकांचा ० ते ३ वर्षे हा वयोगट खूप महत्वाचा असतो.बालपणीचे बालक फार निर्भय आणि जिज्ञासू असतात.आपल्या आजूबाजूच्या वस्तू व लोकांना संदर्भात जाणून घेण्यासाठी ते सतत उत्सुक असतात.यासाठी या काळात कुटुंबाने बालकांचे पालन पोषण खूप काळजीपूर्वक करावे लागते.बालकांचा आहार,आरोग्य,मानसिक वाढ तसेच खेळातून बालकांना प्रशिक्षण याद्वारे बालकांचा विकास परिपूर्ण होऊ शकतो.त्यासाठी बालकांच्या विकासाकरिता निगा राखणाऱ्या कुटुंबाचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे आणि हाच प्रमुख उद्देश ठेऊन हे प्रशिक्षण कवठे महांकाळ येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवठे महांकाळच्या महिला राष्ट्रवादी आघाडीच्या शहराध्यक्षा मिनाक्षी माने,डॉ.हर्षला कदम,नगराध्यक्षा सिंधुताई गावडे उपस्थित होत्या.या प्रशिक्षणास अंगणवाडी सेविका दुर्गा पाटील, सौ.देशमुख,सुवर्णा पाटील,सौ.थोरात,सौ.खोत, सौ.कमलाकर,सौ.यादव,सौ.खैरावकर, स्वाती पाटील तसेच तालुक्यातील आणि शहरातील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.या प्रशिक्षण कार्यक्रमातील उपस्थितांचे स्वागत छाया वाले यांनी केले.प्रास्ताविक सुपरवायझर नंदा माळी यांनी केले.आभार वैशाली राक्षे यांनी मानले.