येळवीचे संतोष पाटील एक झंझावत चेहरा

0
4
जत,संकेत टाइम्स : मागील पाच वर्षात जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत, जनतेने दिलेल्या संधीचे सोनं करत, मिळालेल्या पदाची जाणीव ठेवून पदाला योग्य न्याय देत अनेक सर्वसामान्य कुटुंबातील लोकांची लोकोपयोगी, समाजोपयोगी काम करत अनेक जनसामान्याची मने जिंकण्यात यशस्वी झालो… सर्व सामान्य लोकांच्या मनात आपल्या हक्काचा म्हणून राहिलो… कुणीही निसंकोचपणे सहज काम सांगावं असं मी माझ्या गावासाठी व्यक्तिमत्त्व ठरलो… यातच सारं काही आलं,असे उद्गार येळवी ग्रामपंचायतीचे सदस्य तालुक्यातील एक उगवता चेहरा असलेले संतोष पाटील यांनी काढले आहेत.

 

येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संकेत टाइम्सशी संवाद साधला.
पाटील म्हणाले,गावातील सर्वसामान्य लोकांना शासन दरबारी तालुक्याला हेलपाटे मारायला लागू नये त्यांची शासकीय कागदोपत्र कामे कमी खर्चात गावातल्या गावात व्हावी यासाठी चार वेळा आधार कार्ड शिबिर, दोन वेळा पॅन कार्ड शिबिर, अनेक वेळा मतदान कार्ड, ज्येष्ठ नागरिकांसाठी एस.टी. महामंडळाचे स्मार्ट कार्ड शिबिर, महात्मा फुले जन आरोग्य कार्ड, प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर आयोजित करून वेळोवेळी गरजू पेशंटना ब्लड बँकेकडून ब्लड मिळवून देण्यास मदत केली. रेशन कार्ड शिबीर विधवा महिलांसाठी पेन्शन योजना, ओंकार स्वरूपा कन्यारत्न ठेव योजना, माजी सैनिकांचा सन्मान सोहळा, येळवी व परिसरातील ५० महिलांना मोफत फॅशन डिझाईन कोर्स, प्रत्येक वर्षी आरोग्य शिबिर आयोजित करून मोफत औषधोपचार त्याचबरोबर वृद्ध कलाकारांना मानधन पेन्शन लागू केली. येळवी गावातील २५ मुलांना श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कडून प्रत्येक तीन हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळवून दिली.

 

पाणी फाउंडेशनचे काम करण्यात अग्रभागी राहून गावात जलसंधारण चळवळ राबवली.गाव भागात समाज मंदिराजवळ बोर पडून विद्युत मोटर बसवून त्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधून व त्या ठिकाणचा पाणीपुरवठा गावच्या पाणीपुरवठ्याला जोडून संपूर्ण गावाला पाणीपुरवठा सुरळीत केला. पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून आमदार फंडातून वॉटर ए.टी.एम मंजूर करून पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मार्गी लावला. गावातील व वाडी-वस्तीवरील बंद पडलेल्या पाण्याच्या बोर वेळोवेळी पं.स.जत येथे पाठपुरावा करून दुरुस्त करून सुरळीत चालू केल्या. वार्ड क्र. १ मध्ये विश्वास कोळी घर ते जयसिंग वाणी घर येथे पेविंग ब्लॉक बसवून तसेच नवीन सिमेंटची गटार बांधून नागरिकांचा प्रश्न मार्गी लावला. अनिल सोंगटे घर ते सुतार गल्ली, पाटील वाडा ते ओंकार स्वरूपा चौक, समाज मंदिर ते आण्णासाहेब सुतार यांच्या घरापर्यंत ही रस्त्याची कामे पेव्हिंग ब्लॉक घालून पूर्ण केली. डॉक्टर शास्त्री यांच्या घरामागील गावभागातून येणारया गटारीला पाईप घालून गटारीचे पाणी मार्गी लावले. वार्ड क्रं. १ पवार वस्ती ते पारे रोड येथे खडीकरण व मुरमीकरण या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केला व काम मंजूर केले आहे,गावचा विकास हे ध्येय ठेवून मी राजकारणात आलो आहे.त्यात मी यशस्वी झाल्याचा मोठा आनंद आहे.
यंदाही बहुमतांने सत्ता मिळेल
गावातील नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेऊन मोठे मताधिक्य देऊन सत्ता दिली.आम्हाला शक्य होते,तेवढे नागरिकांचे प्रश्न सोडविले आहेत.यंदाही आम्हच्या पँनेलमधून स्वच्छ चेहरा असलेले उमेदवार असतील.पुर्ण बहुमताने थेट संरपचसह आमचे पँनेल विजयी होईल,असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here