माडग्याळ : जत तालुक्यातील माडग्याळ ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. गुप्त बैठका व उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. दरम्यान, स्थानिक गट सक्रिय झाल्याने चुरस वाढणार आहे.यावेळी थेट सरपंरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. थेट सरपंचपदासाठी चार ते पाच उमेदवार निवडणूक लढण्याची शक्यता आहे. नेते सक्षम उमेदवार मिळवण्यासाठी चाचपणी करीत आहेत. काही नेते आपल्या घरातच उमेदवारी देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
स्थानिक गटनुसार ग्रामपंचायत निवडणूक होणार असल्याची चिन्हे आहेत. मागील निवडणूक तिरंगी झाली होती.यावेळी पण तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता जास्त आहे. काँग्रेस, राष्टवादी, भाजपा या तिन्ही पक्षातच सामना होईल.
तसेच उमेदवारी पॅनेलमधून न मिळाल्यास अपक्ष
उभे राहण्याची तयारी काहीजण करीत आहेत. गावात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. रात्रीच्या अंधारात वेगवान राजकीय हालचाली वेगवान होऊ लागल्या आहेत.