सांगोला : फँबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी क्रीडाक्षेत्रात अथकश्रमाने यश संपादन केले आहे.आपले शरीर निरोगी, आरोग्यदायी रहण्यासाठी सर्व मैदानी खेळ आले पाहिजेत.स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवत असतात.
क्रिडा युवासेना संचनालय महाराष्ट्र राज्य व सोलापूर जिल्हा विभाग संचनालय यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय स्केटिंग स्पर्धेमध्ये फॅबटेक पब्लिक स्कूलच्या इयत्ता चौथी मधील अस्मिता फाटे हिने प्रथम क्रमांक व आसावरी नलावडे हिने द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले दोन्हीही विद्यार्थी पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत.क्रीडाशिक्षक पंचाक्षरी स्वामी यांचे मार्गदर्शन मिळाले.