जत : जत तालुक्यातील देवनाळ ग्रामपंचायत काल (सोमवारी) बिनविरोध झाली.सरपंच म्हणून रामकृष्ण हरीबा शेलार आणि उपसरपंच म्हणून विठ्ठल दळवाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अन्य उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.देवनाळ हे गाव जतपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ग्रामपंचायतीचा कारभार सर्व पक्षांचे नेते करतात, मात्र गावात पक्षीय राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले जाते.
यावर्षीही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी गावातील सर्वच नेते मंडळींनी प्रयत्न केले. यामध्ये यशवंत दुधाळ, निलेश बामणे,अमीत दुधाळ, सदाशिव जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी विशेष काम केले. यावेळी सरपंच म्हणून रामकृष्ण हरीबा शेलार व उपसरपंच म्हणून विठ्ठल मनगेनी दळवाई यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून विजय कुंभार, सागर कांबळे, महानंदा भोसले, सुरेखा ईतापे, अनिता शिंदे,लक्ष्मी हाक्के,यांची निवड करण्यात आली.