सांगली : वीज कनेक्शन मोहीम तातडीने थांबवावी,५० हजार तातडींने प्रोस्ताहन अनुदान दयावे, ऊस तोडणीसाठी द्यावे लागणारे पेसै बंद करावेत,पेसै मागणाऱ्या मुकादमवर गुन्हे दाखल करावेत,द्राक्षाला हमी भाव जाहीर करावा,आदीसह अन्य शेतकरी प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रसह सांगली जिल्ह्यात 22 फेब्रुवारीला रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
मात्र हा चक्का जाम दहावी बारावीच्या परीक्षा असल्याने बुधवारी दुपारी बारानंतर होणार असल्याचे सांगून खराडे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रश्न भेडसावत आहे .या प्रश्नांकडे मात्र सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. आपल्या खुर्च्या टिकवण्यामध्येच सत्ताधारी व्यस्त दिसताय. प्रत्येक विभागात शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. या प्रश्नावर सत्ताधारी लक्ष देत नाही. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सरकार प्रयत्न करत नाही.या सगळ्या विषयांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 22 फेब्रुवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरणार आहे.
जिल्हाध्यक्ष खराडे पुढे म्हणाले कि, प्रोत्साहनपर पन्नास हजार अनुदान ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, थकित वीज बिलापोटी वीज कंपनी शेतकऱ्यांच्या विजेचे कनेक्शन तोडत आहे.उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई असताना विजेचे कनेक्शन तोडले तर शेतकऱ्यांचे पीक करपून जातील व तो उध्वस्त होईल म्हणून हे विजेचे कनेक्शन तोडू नये.तसेच कृषी संजीवनी योजनेची मुदत वाढ 31 मार्चपर्यंत देऊन 50 टक्के पेक्षा कमी बील घेऊन वीज बिलातून शेतकऱ्यांना मुक्त करावे. रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी सबसिडी देऊन रासायनिक खतांच्या किमती नियंत्रित कराव्यात. बुलढाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी केला त्यांची खातेनीहाय चौकशी करावी.
द्राक्षाला हमी भाव जाहीर कारावा. ऊस तोडणीसाठी पैसे मागणार्या मुकादमवर खंडणीचे गुन्हे दखल करावेत.सोयाबीन,कपाशी, कांदा ,द्राक्षे यासारख्या अनेक पिकांचे बाजारभाव पडले आहे.सरकारने हस्तक्षेप करून हे बाजारभाव पूर्ववत करण्यासाठी हस्तक्षेप करून प्रयत्न करावे. अशा प्रमुख मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर 22 फेब्रुवारीला रस्ता रोको करणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर, तासगाव, मिरज,कडेगाव, जत,कवठेमहांकाळ, पलुस,शिराळा, आटपाडी खानापूर या तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी चक्काजाम आंदोलने करण्यात येणार आहेत.शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत.त्या सगळ्या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचे लोकप्रतिनिधींचे लक्ष जावे यासाठी आंदोलन तीव्र स्वरूपात होणार आहे,असे ही खराडे यांनी सांगितले.