जत तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यामुळे पाण्याची पातळी खाली चालली आहे. काही ठिकाणी विहिरी कोरडे पडत असुन शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. हे लक्षात घेत जत तालुक्यातील पूर्व भागात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडावे, अशी मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी विधानसभेत केली होती.आमदार विक्रमसिंह यांच्या मागणीची राज्य शासनाने दखल घेता पाठपुराव्याला यश आले आहे. म्हैशाळ योजनेचे आवर्तन सुरू केले आहे.
आमदार सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले असून ते पाणी माडग्याळ, लकडेवाडी,सोन्याळ, जाडर बबलाद, उटगी,उमदी या भागात म्हैशाळ योजनेचे पाणी पोहोचले असून त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. म्हैशाळ योजनेचे पाणी दाखल झाल्यामुळे पाण्याची पातळीत वाढ होणार असून त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.