आटपाडीत विवाहित महिलेचा लॉजवर खून

0
4

आटपाडी : आटपाडीतील एका लॉजवर महिलेचा खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. छाया मधुकर देवडकर ( वय २७ ,रा. विठ्ठलनगर आटपाडी) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आटपाडीतील  एका लॉजमध्ये गुरुवारी दुपारी  छाया मधुकर देवडकर व संशयिताने खोली बुक करून राहिले होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिला नाही.

शनिवारी सकाळी खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी खोलीचा दरवाजा उघडून पाहिला असता छाया देवडकर हिचा मृतदेह आढळून आला. दरम्यान,याप्रकरणी एका संशयितास आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here