सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्यानंतर जात पडताळणी समितीने दिलेले जातवैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणार्या जत तालुक्यातील ७५ तर सांगली जिल्ह्यातील तब्बल 288 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. जिल्हाधिकारी डॉ. एम. राजा दयानिधी यांनी याबाबतचा अहवाल सर्व तालुक्यातून मागितला आहे.१० तालुक्यात तासगाव तालुका टॉपवर असून तेथील ९७ सदस्यांनी पडताळणी केली नाही तर जत तालुक्यातील ७५ जणांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहेत.
जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेले गावनिहाय सदस्य
जत तालुका (75) : जालीहाळ खुर्द (3), कुडनूर (3), उंटवाडी (1), तिकोंडी (4), उमराणी (6), निगडी बु. (1), उटगी (2), अंकलगी (3), वळसंग (1), गुड्डापूर (2), लमानतांडा उटगी (2), मेंधीगिरी (5), शेड्याळ (3), करेवाडी ति. (2), अंकले (4), भिवर्गी (4), गुगवाड (5), मोरबगी (1), डोर्ली (2), घोलेश्वर (1) सिध्दनाथ (2), सनमडी मायथळ (4), सिंगनहळी (2), शेगाव (7), टोणेवाडी (2)