सोलापूर : कर्नाटकातील श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी गेलेल्या एका कुटुंबीयाच्या वाहनाला जडवाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील हास्पेटजवळ हा भिषण अपघात झाला आहे.मृत्यू झालेल्यामध्ये सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.
राघवेंद्र सुभाष कांबळे (वय २५), त्यांच्या पत्नी जानू राघवेंद्र कांबळे (वय २३), त्यांची मुले राकेश (वय ५) आणि रश्मिका (वय २) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात शेजारच्या इंडी (कर्नाटक) तालुक्यातील नंद्राळ येथील दोन नातेवाइकांचाही मृतांमध्ये समावेश आहे. त्यांची नावे समजू शकली नाहीत.अपघात इतका भिषण होता की दोन्ही वाहने समोरासमोर धडकले,त्यान दोन्ही वाहने इंजिनपर्यत दबली गेली आहेत.




