चेन्नईने पाचव्यांदा आयपील चषकावर नाव कोरले | गतविजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव करत इतिहास रचला

0

यंदाचा बहुचर्चित आयपीएल २०२३च्या चषकावर चेन्नई सुपर किंगजने नाव कोरले असून सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यायत गतविजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचव्यात आयपीएल चषक जिंकण्याचा बहुमान पटकाविला आहे.फायनलयाचा रविवार २८ मे चा सामना दिवस पावसामुळे सोमवारी खेळवण्यात आला.सोमवारी चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

 

प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ४ गडी गमावून २१४ धावाचा मोठा स्कोर उभा केला होता.मात्र चेन्नईची बँटिन सुरू होताच पावसाने सुरूवात केली.त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर तब्बल चार तासानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते.चेन्नईने दमदार बँटिग केली.शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने मोहित शर्माच्या षटकातील दोन चेंडूवर षटकार आणि चौकार मारत ऐतिहासिक विजय मिळवला.

Rate Card

 

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान झालेल्या या फायनलच्या सामन्यात पावसाने मोठा व्यत्यय आणल्याने सामना उशिराने सुरू झाला.मात्र दिलेले टारगेट एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने पार करत विजय मिळवला.या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्ज आता आयपीएल इतिहासात पाच वेळा चॅम्पियन असलेला दुसरा संघ ठरला आहे.यंदाही गुजरात टायटन्सला सलग दुसऱ्या आयपीएल हंगामात विजेतेपद मिळवता आले नाही.

 

चेन्नईच्या आघाडीच्या फलंदाजांनी प्रांरभही चांगला केला, परंतु गुजरातचे हुकमी एक्के गोलदांज नूर अहमद व मोहित शर्मा यांनी मॅच फिरवली होती. पण,रवींद्र जडेजाने या थरारक सामन्यात अखेरच्या दोन चेंडूंत १० धावा चोपून विजय मिळवून दिला.विजयानंतर देशभर एकच जल्लोष करण्यात आला.साई सुदर्शनने गुजरातकडून सर्वाधिक ९६ धावा केल्या. त्याचवेळी ऋद्धिमान साहाने ५४ धावांची खेळी केली. शुबमन गिलने ३९आणि हार्दिक पांड्याने नाबाद २१ धावा केल्या. चेन्नईचे सर्व गोलंदाज चांगलेच महागडे ठरले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.